शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ हॉकीची कोणती निवड समिती वैध? हॉकी इंडियाचा हायकोर्टात अर्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 21:57 IST

विदर्भ हॉकी संघटनेतील अंतर्गत कलहात आणखी नवीन वादाची भर पडली आहे. आतापर्यंत विवेक सिरिया यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला निर्विवाद समजले जात होते. परंतु, ती समिती २५ ऑगस्ट २०१८ रोजी रद्द करून नवीन समिती स्थापन करण्यात आली असल्याचे हॉकी इंडियाला ई-मेलद्वारे कळविण्यात आले आहे. त्यामुळे कोणती निवड समिती वैध मानावी हा प्रश्न हॉकी इंडियाला पडला असून कार्यकारी संचालक आर. के. श्रीवास्तव यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे व याविषयी योग्य आदेश जारी करण्याची विनंती केली आहे.

ठळक मुद्देयोग्य आदेश जारी करण्याची विनंती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ हॉकी संघटनेतील अंतर्गत कलहात आणखी नवीन वादाची भर पडली आहे. आतापर्यंत विवेक सिरिया यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला निर्विवाद समजले जात होते. परंतु, ती समिती २५ ऑगस्ट २०१८ रोजी रद्द करून नवीन समिती स्थापन करण्यात आली असल्याचे हॉकी इंडियाला ई-मेलद्वारे कळविण्यात आले आहे. त्यामुळे कोणती निवड समिती वैध मानावी हा प्रश्न हॉकी इंडियाला पडला असून कार्यकारी संचालक आर. के. श्रीवास्तव यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे व याविषयी योग्य आदेश जारी करण्याची विनंती केली आहे.१७ ते २९ जूनपर्यंत बिलासपूर येथे सब-ज्युनियर हॉकी नॅशनल चॅम्पियनशिप (बी-डिव्हिजन) स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी जुन्या व नव्या निवड समितीने आपापले संघ निवडले आहेत. त्यांनी हॉकी इंडियाला १९ व २० मे रोजी ई-मेल पाठवून आपापल्या संघाची माहिती कळवून त्यांना स्पर्धेत सहभागी करून घेण्याची विनंती केली आहे. संघटनेतील एका गटाचे प्रतिनिधित्व करणारे ए. पी. जोशी व प्रमोद जैन यांच्या नेतृत्वात नवीन निवड समिती स्थापन झाली असून त्यांनी जुन्या समितीला विरोध केला आहे. राजस्थानमधील सिकर येथे १५ ते २५ मेपर्यंत झालेल्या नवव्या अखिल भारतीय सब-ज्युनियर महिला हॉकी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जुन्या समितीने निवडलेल्या संघाला सहभागी करून घेण्यात आले होते. त्याविषयी उच्च न्यायालयाने आदेश दिला होता. त्यामुळे हॉकी इंडियाने या स्पर्धेसाठीही उच्च न्यायालयाकडून योग्य आदेश मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज मंगळवारी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणीसाठी लागला होता. दरम्यान, न्यायालयाने इतर संबंधित पक्षकारांना अर्जावर उत्तर सादर करण्यासाठी वेळ मिळावा याकरिता प्रकरणावर ७ जून रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. हॉकी इंडियातर्फे अ‍ॅड. रितेश बढे यांनी कामकाज पाहिले.असे आहे मूळ प्रकरणविदर्भ हॉकी संघटनेतील दोन गटामध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे हॉकी इंडियाने संघटनेची सदस्यता निलंबित केली आहे. त्याविरुद्ध संघटनेचे सचिव विनोद गवई व अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर विविध तारखांना सुनावणी घेतल्यानंतर गेल्या १६ एप्रिल रोजी न्यायालयाने संघटनेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याचा आदेश धर्मादाय उपायुक्तांना दिला होता. तसेच, संघटनेमध्ये सर्वकाही सुरळीत होतपर्यंत सर्वसंमत निवड समिती (जुनी) विविध राष्ट्रीय हॉकी स्पर्धांसाठी विदर्भ संघाची निवड करेल असे स्पष्ट केले होते. परंतु, आता त्या निवड समितीच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रोहित शर्मा यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयHockeyहॉकी