शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांनी उपचार कुठे घ्यायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 01:00 IST

शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या व होणारे मृत्यू लक्षात घेता शहरातील ४२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांचे उपचार सुरू आहेत. पुन्हा संख्या वाढवली जात आहे. सोबतच खासगी रुग्णालयांकडून काढण्यात येणाऱ्या बिलाचे ऑडिट केले जात असल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे. दुसरीकडे आधी पैसे जमा करा नंतर उपचार अशी भूमिका खासगी हॉस्पिटलने घेतली आहे. अशा परिस्थितीत दीड-दोन लाख रुपये जमा करणे शक्य नसलेल्या गरीब कोविड रुग्णांनी उपचार कुठे घ्यायचे, असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देखासगी रुग्णालयात आधी पैसे नंतर उपचार : बेड वाढले पण यंत्रणा हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या व होणारे मृत्यू लक्षात घेता शहरातील ४२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांचे उपचार सुरू आहेत. पुन्हा संख्या वाढवली जात आहे. सोबतच खासगी रुग्णालयांकडून काढण्यात येणाऱ्या बिलाचे ऑडिट केले जात असल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे. दुसरीकडे आधी पैसे जमा करा नंतर उपचार अशी भूमिका खासगी हॉस्पिटलने घेतली आहे. अशा परिस्थितीत दीड-दोन लाख रुपये जमा करणे शक्य नसलेल्या गरीब कोविड रुग्णांनी उपचार कुठे घ्यायचे, असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.कोविड रुग्णांसाठी बेडची संख्या २ हजारापर्यंत वाढवल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे उपचारासाठी रुग्णांची भटकंती थांबलेली नाही. शासकीय रुग्णालयात जागा नाही. खासगी रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही. मनपाच्या नियंत्रण कक्षाकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला तर वेळेवर फोन लागत नाही. लागला तरी उपचार मिळेलच याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत दोन-अडीच लाख खर्च करण्याची कुवत नसलेल्यांनी उपचार कुठे घ्यावे, असा गंभीर प्रश्न पडला आहे.उपचारावरील खर्चाचा बोर्ड लावावाखासगी रुग्णालयांनी दर्शनी भागात कोविड रुग्णांच्या माहितीसाठी उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची माहिती असलेला बोर्ड लावावा. तसेच कोविड रुग्णांसाठी असलेले बेड, उपचार सुरू असलेले रुग्ण, रिक्त बेड, उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.अधिकारी खासगी रुग्णालयात भरतीकोरोनाबाधितांवर वेळेत उपचार करता यावेत, यासाठी मेडिकल आणि मेयो येथे अतिरिक्त खाटांची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. विविध यंत्रणांनी सज्ज असल्याचे वेळोवेळी सादरीकरण केले. मात्र यंत्रणा सज्ज असल्याचे सांगणारे अनेक अधिकारी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.नियंत्रणाची गरजमनपाची चार रुग्णालये सुसज्ज करण्यात आली. येथे कोविड रुग्णांवर उपचार होणे अपेक्षित होते. मात्र इंदिरा गांधी रुग्णालय वगळता अन्य ठिकाणी उपचार सुरू झालेले नाही. इंदिरा गांधी रुग्णालयातही मनुष्यबळाची समस्या आहे. दुसरीकडे खासगी रुग्णालयांवर प्रशासनाचा वचक दिसत नाही. रुग्णांकडून वारेमाप बिल वसुलणाºया रुग्णालयांना नोटीस बजावण्यापलिकडे कारवाई होत नसल्याने त्यांना प्रशासनाचा धाक राहिलेला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर