शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

निरोप कसला माझा घेता...जेथे राघव तेथे सीता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 21:00 IST

गीतरामायणाचे शिल्पकार ग. दी. माडगुळकर व स्वरतीर्थ सुधीर फडके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. या दोघांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी विदर्भातील संस्कार भारतीच्यावतीने गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत गीतरामायण महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत रामेश्वरी येथील राम मंदिरात गीत रामायणाची एक मैफिल घेण्यात आली. दरम्यान, रसिकांनी निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता... यासारख्या अविट गोडीच्या गाण्यांचा आनंद लुटला.

ठळक मुद्देगीत रामायणाची सुरेल मैफिल : संस्कार भारतीचा संगीतमय कार्यक्रम

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : गीतरामायणाचे शिल्पकार ग. दी. माडगुळकर व स्वरतीर्थ सुधीर फडके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. या दोघांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी विदर्भातील संस्कार भारतीच्यावतीने गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत गीतरामायण महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत रामेश्वरी येथील राम मंदिरात गीत रामायणाची एक मैफिल घेण्यात आली. दरम्यान, रसिकांनी निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता... यासारख्या अविट गोडीच्या गाण्यांचा आनंद लुटला.नुपुर संगीत व कला आराधना संस्थेच्या कलावंतांनी एकूण १६ गाणी सादर करून या महायज्ञात सुरेल समिधा वाहिली. रचना खांडेकर-पाठक यांनी स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुश-लव रामायण गाती... हे पहिले पुष्प वाहिले. अभय पांडे यांनी दशरथा घे हे पायसदान... गीत समरसून गायले. राम जन्मला गं सखी राम जन्मला... गीत दीपाली जोगळेकर यांनी सादर करून रसिकांची दाद मिळवली. त्यानंतर मिलिंद कोरटकर यांनी ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा..., करुणा दांडेकर यांनी रामा चरण तुझे लागले आज मी शापमुक्त झाले..., अभय पांडे यांनी आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे..., भाग्यश्री शिंगरु यांनी मज आणून द्या हो हरीण अयोध्या नाथा..., महेश मगरे यांनी थांब सुमंता थांबवी रे रथ..., पूजा पाठक यांनी प्रभो मज एकची वर द्यावा... तर, पुष्पा जोगे यांनी त्रिवार जयजयकार... हे गीत सादर केले.नंदा सराफ व पद्मा रावळे यांनी सहगायनात साथ दिली. की-बोर्डवर हर्ष गडकरी, तबल्यावर रघुवीर पुराणिक व प्रभावत चन्ने, ताल वाद्यावर निधी रानडे व वेदिका जोगळेकर यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. कांचन भालेकर यांनी संचालन केले. संहिता लेखन आशुतोष अडोणी यांचे होते तर, ज्येष्ठ ताल वादक गजानन रानडे यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Geetramayanगीतरामायणnagpurनागपूर