उपराजधानीत हेल्मेटसक्ती आहे. पण, ती वाहतूक पोलिसांनी कधी गांभीर्याने घेतली ना नागरिकांनी. मधल्या काळात धडाक्यात कारवाया सुरू झाल्या. रस्त्यावर बॅरिकेटस लावून हजारो वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला. दीड महिन्यापासून मात्र कधीतरीच काही मुख्य रस्त्यावर कारवाई सुरू दिसते. एरवी ती थंडावलेलीच असते. त्यामुळे विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण जवळपास ८० टक्क्यावर आले आहे. कारवाईच्या काळात ८० टक्के वाहनचालक हेल्मेट घालून दिसत होते. दोन दिवसापूर्वी वाहतूक पोलिसांनी जनजागृती करून पुन्हा कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पाहू या वाहतूक पोलीस गांभीर्याने कारवाईवर भर देतात की वाहनचालक हेल्मेट घालूनच घराबाहेर पडतात ते!
हेल्मेटसक्ती आहेच कुठे ?
By admin | Updated: July 18, 2016 02:37 IST