शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
2
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
3
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
6
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
7
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
8
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
9
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
10
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
12
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
13
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
14
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
15
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
16
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
17
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
18
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
19
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
20
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता

नागपूर शहरातील फुटाळा तलावाचे पाणी झिरपते कुठे? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 11:12 AM

Nagpur News फुटाळा तलावाचे पाणी कमी हाेत आहे. तर म्युझिकल फाऊंटनचा आणि साैंदर्यीकरणाचा काय उपयाेग हाेइल, असा प्रश्न जलसाठे व भूजल संवर्धनाबाबत कार्य करणारी एनजीओ स्वच्छ असाेसिएशनचे सचिव शरद पालिवाल यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देकमी हाेत आहे जलस्तरबांधकामामुळे भूजल स्त्राेत बिघडण्याचा धाेका

निशांत वानखेडे

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील ऐतिहासिक फुटाळा तलावाबाबत आलेल्या एका माहितीने पर्यावरण तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. या तलावाचा जलस्तर ३ ते ४ फूट घटल्याची माहिती समाेर आली आहे. असे हाेत राहिले, तर एक दिवस तलावाचे पाणी दिसेनासे हाेईल, आणि त्याचे अस्तित्वच धाेक्यात येइल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र असे का हाेत आहे, हा प्रश्न आहे. खरंतर यावेळी तलावाचे सखाेल सर्वेक्षण हाेणे नितांत गरजेचे आहे. मात्र तलाव किंवा भूजलस्तराच्या अभ्यासाची जबाबदारी असलेल्या संस्था याबाबत गंभीर दिसत नाही.

जलसाठे व भूजल संवर्धनाबाबत कार्य करणारी एनजीओ स्वच्छ असाेसिएशनचे सचिव शरद पालिवाल यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. फुटाळा तलावाचे पाणी कमी हाेत आहे, हा चिंतेचा विषय आहे. यामुळे तलावाचे अस्तित्वच संकटात आले आहे. एक दिवस पाणीच राहणार नाही, तर काेट्यवधी खर्च करून तयार हाेणाऱ्या म्युझिकल फाऊंटनचा आणि साैंदर्यीकरणाचा काय उपयाेग हाेइल, असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तलावाचे पाणी का कमी हाेत आहे, याबाबत त्यांनी शक्यता नाेंदविल्या आहेत; मात्र याेग्य अभ्यास केल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. मात्र त्याकडे कुणाचे लक्ष नाही. साैंदर्यीकरणाच्या कामाकडे लक्ष देताना तलावाच्या खंडित हाेणाऱ्या सुरक्षा भिंतीकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देत नाही. एक दिवस ही भिंत तलावात खचेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

जलस्तर घटण्याच्या शक्यता

१) तलावाच्या परिसरात साैंदर्यीकरण व म्युझिकल फाऊंटनबाबत बांधकाम हाेत आहे. या कामाच्या कंपनामुळे तलावाचा बांध कुठूनतरी फुटला असावा व त्यातून पाणी झिरपत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे माेठी दुर्घटना हाेण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

२) जमिनीच्या आतमध्ये भूजलसाठे (रिजर्वायर) असतात. काही तलावाच्या आकाराचे असतात, जे भूजल वाहिन्यांशी जाेडलेले असतात. बांधकामाच्या कंपनामुळे या भूजल वाहिन्या खंडित हाेऊन जमिनीतील भूजलसाठे तलावाशी जुळले असू शकते. अशावेळी तलावाचे पाणी अशा भूजलसाठ्यांमध्ये झिरपून कधी नाहीशे हाेईल, पत्तासुद्धा लागणार नाही, अशी भीती पालिवाल यांनी व्यक्त केली.

३) आसपासच्या वस्त्यांमधील सांडपाणी वाहत तलावात जात असल्याने तलावाचे नैसर्गिक स्त्राेत बुजण्याची शक्यता आहे.

४) पावसाचे पाणी ज्या जंगल भागाकडून वाहत तलावामध्ये येते, त्या भागात रस्त्याचे व इतर बांधकाम झाल्याने पाण्याचा प्रवाह खंडित झाला आहे. यामुळेही जलस्तर घटला असल्याचा अंदाज पालिवाल यांनी व्यक्त केला.

काय परिणाम हाेतील?

- फुटाळा तलावाच्या पाण्यामुळे सीताबर्डीपर्यंतच्या विहिरींचा जलस्तर चांगला आहे. त्यामुळेच विहिरी भरल्या आहेत. तलावाचे पाणी घटले, तर या विहिरींची भूजल पातळी विचलित हाेण्याचा धाेका आहे.

- एक दिवस तलावाचे अस्तित्वच नाहीसे हाेईल. त्यावेळी साैंदर्यीकरणाचे काय काम राहणार?

- तलावातील जैवविविधता उदध्वस्त हाेईल.

तलावाचा जलस्तर घटणे गंभीर बाब आहे. यावेळी भूगर्भ शास्त्रविभाग, केंद्रीय व राज्य भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे दखल घेऊन सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. तलाव कोरडा पडल्यास साैंदर्यीकरणाचा उपयाेग राहणार नाही. त्यामुळे तलावाच्या मूलभूत गाेष्टींच्या संवर्धनाकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे.

- शरद पालिवाल, सचिव, स्वच्छ असाेसिएशन

टॅग्स :Futala Lakeफुटाळा तलाव