शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांना’ कधी होणार शिक्षा़ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 11:11 IST

एकतर्फी प्रेमातून निर्दोष तरुणींना निर्दयपणे संपविणाऱ्या अनेक क्रूरकर्म्यांचा निकाल अद्यापही लागलेला नाही. केसही बोर्डावर आलेली नाही. त्यामुळे ‘त्या’क्रूरकर्म्यांचा ‘निकाल’ कधी लागणार, असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे.

ठळक मुद्देसानिकाची केस अद्याप बोर्डावरच नाही

नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या हिंगणघाट जळीतकांडाची सुनावणी जलदगती न्यायालयात करून नराधमाला लवकरात लवकर शिक्षा देण्याची घोषणा झाली आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणापासून तो नागपुरातील सानिका प्रकरणापर्यंत अनेकदा अशा घोषणा झाल्या आहेत. त्यातून उफाळलेल्या रोषाला तात्पुरता दिलासा मिळू शकतो. मात्र, एकतर्फी प्रेमातून निर्दोष तरुणींना निर्दयपणे संपविणाऱ्या अनेक क्रूरकर्म्यांचा निकाल अद्यापही लागलेला नाही. केसही बोर्डावर आलेली नाही. त्यामुळे ‘त्या’क्रूरकर्म्यांचा ‘निकाल’ कधी लागणार, असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे.राज्यात यापूर्वी रिंकू पाटील, अमृता देशपांडे, दीपाली वानखेडे, नीता हेंद्रे, सानिका थूगावकर या तरुणी अशाच क्रौर्याच्या बळी ठरल्या. दिल्लीतील निर्भयाकांडाने देशभर संतापाची लाट उसळली होती. प्रत्येक वेळी उफाळून आलेला जनक्षोभ शांत करण्यासाठी ‘या प्रकरणाचा’ तातडीने निकाल लावू, आरोपींना फासावर टांगू , अशी भाषा वापरण्यात येते. प्रत्यक्षात असे काहीही होत नाही. निर्भया प्रकरणातील क्रूरकर्मा अद्यापही कायदेशीर लाईफ लाईनचा वापर करून फासाला हुलकावणी देत आहेत. नागपुरातील सानिका प्रदीप थूगावकर (वय १८) या निरागस तरुणीच्या हत्येला आता १९ महिने झाले आहे. सर्वसाधारण परिवारातील सानिका टेक्स्टाईल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाला शिकायची. लक्ष्मीनगरातील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये तिचे मामा अविनाश पाटणे राहतात. त्यांच्या फायनान्स कार्यालयात ती काम करायची. रोहित हेमनानी(बोलानी) सोबत तिची मैत्री होती. मात्र, त्याचे विक्षिप्त वर्तन खटकत असल्याने तिने त्याच्यापासून स्वत:ला दूर करून घेतले होते. दरम्यान, मैत्रीला प्रेम मानत हेमनानी सानिकावर अधिकार गाजवू पाहत होता.ती दाद देत नसल्याने त्याने तिला एकदा शेवटचे भेटायचे आहे, असे म्हणत १ जुलै २०१८ च्या रात्री ७.४५ च्या सुमारास हेमनानीने सानिकाला तिच्या मामाच्या कार्यालयात गाठले. ‘तू माझ्याशी संबंध का तोडले’ असा प्रश्न करीत त्याने तिच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर चाकूचे सपासप घाव घालून तिला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले होते.विशेष म्हणजे, हिंगणघाटमधील पीडित प्राध्यापिका ज्या रुग्णालयात मृत्यूशी झूंज देत आहे, त्याच रुग्णालयात सानिकाने तब्बल महिनाभर मृत्यूशी झूंज दिली अन् अखेर नियतीपुढे हात टेकत प्राण सोडले. या घटनेमुळे नागपुरात त्यावेळी प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली होती. आरोपी हेमनानीला तातडीने कठोर शिक्षा करा, अशी संतप्त नागरिकांनी मागणी केली होती.बजाजनगर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला तीन दिवसानंतर बडनेरा (अमरावती) स्थानकावर अटक केली होती. या थरारक गुन्ह्याला आता तब्बल १८ महिने झाले. आरोपीला शिक्षा होणे दूर ही केसदेखील अजून बोर्डावर आलेली नाही. आरोपी बिनभाड्याच्या खोलीत मोफतचे जेवण घेत आहे.

३० दिवसांत न्याय!हिंगणघाटच्या जळीतकांडाने देशभर संतापाची लाट उसळली आहे. महिला-मुलींच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. त्या लक्षात घेता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) हा खटला चालवून पीडित प्राध्यापिका आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर कायद्याचा अभ्यास करून या जळीतकांडातील क्रूरकर्म्याचा ३० दिवसांच्या आत कायदेशीर निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही म्हटले आहे. हीच घोषणा आणि हाच न्याय दिवंगत सानिकाच्या प्रकरणातही लागू होईल का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी