शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत ‘क्वारंटाईन’मधील तपासणीचा वेग कधी वाढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:10 IST

नागपुरात क्वारंटाईन सेंटरमध्ये लोकांची संख्या वाढत आहे. सोबतच या सेंटरमधील असुविधांमुळेही संसर्ग पसरत असल्याची भीतीही लोकांमध्ये आहे. अशा परिस्थितीत नागपुरात क्वारंटाईन केलेल्या जास्तीत जास्त लोकांची तपासणी करण्याची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देसंसर्ग पसरत असल्याने दहशतअसुविधांचीही भर

फहीम खानलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात गेल्या १८ दिवसात २०० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. यादरम्यान हजारो लोकांना प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये अजूनही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. क्वारंटाईन सेंटरमध्ये लोकांची संख्या वाढत आहे. सोबतच या सेंटरमधील असुविधांमुळेही संसर्ग पसरत असल्याची भीतीही लोकांमध्ये आहे. अशा परिस्थितीत नागपुरात क्वारंटाईन केलेल्या जास्तीत जास्त लोकांची तपासणी करण्याची आवश्यकता आहे.मेयो व मेडिकलमधील प्रयोगशाळेवर नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील नमुने तपासण्याचा भार वाढू लागला आहे. यासोबत छत्तीसगड व मध्यप्रदेशातील नमुनेही तपासणीसाठी येथे पाठवले जात आहेत. अशा परिस्थितीत नागपुरातील नमुने कमी प्रमाणावर तपासले जात आहेत. आता या दोन्ही प्रयोगशाळांच्या मदतीसाठी माफसु, नागपूर एम्स आणि नीरीच्या प्रयोगशाळेतही तपासणी सुरू झाली आहे. प्रयोगशाळांची संख्या वाढल्यानंतर दैनिक नमुन्यांची संख्या ५०० वर पोहोचली आहे. अगोदर ती दररोज २०० पेक्षा कमी होती. परंतु यानंतरही विदर्भातील नमुन्यांची संख्या यापेक्षा जास्त असल्याने ती तपासली जात नाही.तपासणीत केव्हा येणार गती?आतापर्यंत नागपुरात ६,२८५ नमुन्यांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ३०० पेक्षा अधिक लोक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. २,२५३ लोक अजूनही क्वारंटाईन सेंटरमध्ये आहेत. ४६६ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलेल्या लोकांची ज्या गतीने तपासणी व्हायला हवी, ती होत नाही. अशा परिस्थितीत लोकही दहशतीत आहेत. कारण या सेंटरमधील सध्याच्या व्यवस्थेमुळे त्यांना संसर्ग होण्याची जास्त भीती वाटत आहे. क्वारंटाईन सेंटरमधील अव्यवस्था, शौचालयासह विविध साहित्यांचा सार्वजनिक वापर, वॉटर कुलरमधून सर्वांनाच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टेबलवर ठेवलेला चहा सर्वांनाच शेअर करणे आदींमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याचा धोका वाढल्याचा आरोपही होत आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस