शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

मनोरुग्णालयातील डॉक्टर कधी होणार शहाणे ?

By admin | Updated: January 19, 2017 02:32 IST

नागपूर प्रादेशिक शासकीय मनोरुग्णालयात डॉक्टरांची मनमानी सुरू आहे. त्यांची रुग्णालयात येण्याची वेळ सकाळी ८ ची आहे.

यायची वेळ ८ ची, डॉक्टर येतात ९.३० ला : उपचारासाठी ताटकळत उभे असतात रुग्ण योगेंद्र शंभरकर   नागपूर नागपूर प्रादेशिक शासकीय मनोरुग्णालयात डॉक्टरांची मनमानी सुरू आहे. त्यांची रुग्णालयात येण्याची वेळ सकाळी ८ ची आहे. परंतु डॉक्टर पोहोचतात सकाळी ९.३० ला. याचा फटका रुग्णांना बसत असून शहर व आजूआजूच्या गावातून उपचारासाठी येथे येणाऱ्यांना बराच वेळ ताटकळत बसावे लागते. लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ही धक्कादायक बाब उघड झाली. लोकमतची टीम मंगळवारी सकाळी ८ वाजता मनोरुग्णालयाच्या ओपीडी इमारतीत दाखल झाली. येथे कसे काम चालते यावर बारीक लक्ष ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी बुधवारी ही टीम सकाळी ८ पासून रुग्णांसोबत बसून राहिली. ओपीडी कार्ड काऊंटरवर सकाळी ८ ते दुपारी १ अशी वेळ लिहिली होती. काही अटेंडेंट, गार्ड आणि नर्स वेळेत रुग्णालयात दाखल झाले. पण, तरीही हे काऊंटर २० मिनिटानंतर सुरू झाले. रूम नंबर दोन जेथे ओपीडी असते तेथे ८.४५ पर्यंत डॉक्टरांचा पत्ता नव्हता. टीम औषध वितरण विभागात पोहोचली. फार्मासिस्ट असतानाही अटेंडंट वाटतो औषध सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोरुग्णालयाच्या औषध विभागात दोन फार्मासिस्टची नियुक्ती करण्यात आली आहे. याचे कारण, मनोरुग्णांना १० ते १२ प्रकारची औषधे दिली जातात. अनेकदा तर अटेंडंटच रुग्णांना औषध देत असतो. या विभागात आधीच दोन फार्मासिस्ट आहेत, अटेंडंटही प्रशिक्षित आहे तर मग आणखी फार्मासिस्टची गरज का पडतेय, हा खरा सवाल आहे. इतका उशीर होतोच कसा? काही रुग्णांच्या नातेवाईकांनी नाव न छापण्याच्या अटीवर डॉक्टरांची तक्रार केली. ते म्हणाले, वाहतुकीच्या गर्दीमुळे १०-१५ मिनिटांचा उशीर समजू शकतो. परंतु गलेलठ्ठ पगार घेऊनही येथील डॉक्टर तासतासभर उशिरा येत असतील तर योग्य नाही. याचा अर्थ येथील डॉक्टरांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नाही. येथील पुरुष डॉक्टरांचा रेकॉर्ड थोडा बरा आहे. ते किमान सकाळी ९पर्यंत तरी पोहोचतात. परंतु महिला डॉक्टर नेहमी ९.३० नंतरच रुग्णालयात येतात. बायोमेट्रिक मशीन नाही? अधिक माहिती जाणून घेतली असता कळले की रुग्णालय उपअधीक्षकांच्या खोलीत ठेवलेल्या एका रजिस्टरवर उपस्थित कर्मचारी सही करतात. परंतु उशिरा आल्याची नोंद एखादाच डॉक्टर करतो. मंगळवारी सकाळी ९ वाजता एक पुरुष डॉक्टर आले. सही करून ९.३० पर्यंत ओपीडीमध्ये बसले. यानंतर आलेले डॉक्टर सकाळी ९.३० वाजता रजिस्टरवर सही करताना आढळून आले.