शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

गरीब विद्यार्थ्यांना सायकल कधी मिळणार?

By admin | Updated: May 16, 2017 02:19 IST

शैक्षणिक सत्र संपल्यानंतरही जि.प.च्या समाजकल्याण विभागाच्या सायकलींचे वाटप गरीब विद्यार्थ्यांना होऊ शकले नाही.

सत्र संपल्यानंतरही विद्यार्थी प्रतीक्षेत : समाजकल्याणच्या ८० लाखांच्या सायकलींचे वाटपलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शैक्षणिक सत्र संपल्यानंतरही जि.प.च्या समाजकल्याण विभागाच्या सायकलींचे वाटप गरीब विद्यार्थ्यांना होऊ शकले नाही. समाजकल्याणच्या सायकल वाटपात घोळ, अनियमितता झाल्याचा मुद्दा मुंबई अधिवेशनात उपस्थित झाल्यानंतर सीईओंनी यावर अधिकाऱ्यांची चौकशी समिती बसविली होती. या समितीचा अहवाल आल्यानंतरही सायकलींचे वाटप झालेले नाही. जि. प. च्या समाजकल्याण, शिक्षण आणि महिला व बालकल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांना सायकली पुरविल्या जातात. समाजकल्याण विभागातर्फे २०१६-१७ या वर्षासाठी ८० लाख रुपयांमधून विद्यार्थ्यांना सायकली मंजूर करण्यात आल्या. २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यातील एकूण १४८० विद्यार्थ्यांना सायकली द्यायच्या होत्या. समाजकल्याण समितीचे सभापती दीपक गेडाम यांच्या पुढाकाराने निविदा प्रक्रिया पार पडून सायकलींची खरेदीसुद्धा झाली. सावनेर, पारशिवनी, मौदा, कामठी, नागपूर ग्रामीण या पाच तालुक्यांमध्ये ८३० सायकली पोहोचल्या. मात्र, मध्येच कुठेतरी ‘माशी शिंकली’ आणि सायकलीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. नंतर मात्र विरोधकांनी चूक झाल्याचे मान्य केले खरे. पण, हा मुद्दा मुंबई अधिवेशनात आमदारांकडून उपस्थित केल्यामुळे सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सायकल वाटप थांबविण्याचे आदेश देऊन अधिकाऱ्यांची समिती चौकशीसाठी नेमली. या घडामोडीत विद्यार्थ्यांना सायकली मिळाल्या नाही. समितीची चौकशी कासवगतीने सुरू असल्याची नाराजी सभापती गेडाम यांनी व्यक्त केली. नुकतीच चौकशी करून समितीने अहवाल डॉ. बलकवडे यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती आहे. नवे सत्र सुरू होण्यापूर्वी मिळेलसायकलप्रकरणी चौकशी पूर्ण झाली असून, अहवाल सीईओंकडे देण्यात आला आहे. ८० लाखांच्या सायकल खरेदीपैकी ८५० सायकली पाच पंचायत समितीत पोहचल्या आहे. सीईओंकडून उर्वरित ६३० सायकलींना मंजुरी दिली आहे. लवकरच सायकलींचा पुरवठा होईल. काही सदस्यांकडून अद्यापही लाभार्थ्यांच्या याद्या यायच्या आहेत. नवे सत्र सुरू होण्यापूर्वी सायकलींचे वाटप होईल, असा विश्वास समाजकल्याण समितीचे सभापती दीपक गेडाम यांनी व्यकत केला. डीबीटीमध्ये रखडल्या बालकल्याण व शिक्षणच्या सायकली सायकल खरेदी प्रक्रियेत समाजकल्याणने बाजी मारली, तर दुसरीकडे शिक्षण आणि महिला व बालकल्याण समितीच्या सायकली ‘डीबीटी’ (डायरेल्ट बॅक ट्रान्सफर) च्या कचाट्यात रखडल्या आहेत. यात महिला व बाल कल्याणच्या ८० लाख व शिक्षण विभागाच्या ५० लाख रुपयांच्या सायकलींचा समावेश आहे.