शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

अवैध वृक्षतोड कधी थांबणार!

By admin | Updated: June 30, 2014 00:37 IST

अवैध वृक्षतोड वन विभागासाठी नित्याची बाब ठरली आहे. एकिकडे दरवर्षी वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात असताना, खाजगी ठेकेदार काही वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून

पवनी येथील घटना : आरोपी ठेकेदाराची जामिनावर सुटका नागपूर : अवैध वृक्षतोड वन विभागासाठी नित्याची बाब ठरली आहे. एकिकडे दरवर्षी वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात असताना, खाजगी ठेकेदार काही वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जंगलाचा सफाया करीत आहे. पवनी वनपरिक्षेत्रातील घटना याचाच एक भाग मानल्या जात आहे. त्यामुळे अवैध वृक्षतोडीचा हा गोरखधंदा कधी थांबणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. माहिती सूत्रानुसार पवनी वनपरिक्षेत्रातील कुसदा बिटामधील कक्ष क्र. २९९ येथील संरक्षित जंगलातील लाखो रुपयांच्या सागाच्या झाडांची अवैध कटाई झाली आहे. मात्र असे असताना वन विभाग यातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बचाव करताना दिसून येत आहे. त्यामुळे अजूनपर्यंत एकही वन अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई झालेली नाही.दुसरीकडे या प्रकरणातील मुख्य आरोपी ठेकेदार प्रेमलाल देशवानी याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्याची जामिनावर सुटका झाली असल्याची माहिती आहे. आरोपी ठेकेदाराने गत १२ ते १५ दिवसांपूर्वी स्थानिक वन अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून ही अवैध वृक्षतोड केल्याचा आरोप आहे. त्यामुळे गत १५ दिवसांपासून त्याची कुठेही वाच्यता झाली नाही. परंतु एका त्रयस्थ व्यक्तीला त्याची चाहूल लागताच, त्यांनी थेट वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडे तक्रार करताच या संपूर्ण प्रकरणाचा भंडाफोड झाला. त्यानंतर वरिष्ठांकडून नागपूरचे मुख्य वनसंरक्षक व विभागीय वन अधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश मिळताच, शुक्रवारी सर्वांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आरोपी ठेकेदाराने वन विभागाचे कक्ष क्र. २९९ शेजारच्या दोन खसऱ्यामधील सागाच्या झाडांची खरेदी केली होती. त्यानुसार वन विभागाने त्याला ती झाडे तोडून त्यांची वाहतूक करण्याचा परवानाही जारी केला होता. मात्र आरोपीने त्या दोन खसऱ्यासोबतच शेजारच्या कक्ष क्र. २९९ मधील शेकडो झाडांची अवैध कटाई केली. वन विभागाने केलेल्या चौकशीत येथे १४०० नगांची अवैध कटाई झाल्याचे उघडकीस आले आहे. हा संपूर्ण माल ७३ घनमीटर असून, त्याची खुल्या बाजारातील किमत २० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय घटनास्थळी ४०० थूट आढळून आले आहे. मात्र वन विभागाने त्यापैकी १६७ थुटांचीच मोजणी करून, त्यांची किमत १३ लाख रुपये आकारल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)