शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

नागपुरात मुलींचा जन्मदर वाढणार कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 9:01 PM

उपराजधानी असलेल्या नागपुरात मुलींचा जन्मदर हवा तसा वाढलेला नाही. गेल्या सात वर्षांत जन्मदराची टक्केवारी जवळपास स्थिरच असून २०१७ मध्ये मुलांच्या तुलनेत सरासरी ९३ टक्के इतकीच आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देमुलांच्या प्रमाणात ९३ टक्के मुलींचा जन्म : सात वर्षांत आकडेवारी स्थिरच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य व केंद्र पातळीवर ‘बेटी बचावो’ मोहीम व्यापक पातळीवर राबविण्यात येत आहे. यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर जनजागृतीदेखील नियमितपणे सुरू असल्याचे दिसून येते. मात्र तरीदेखील राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मुलींचा जन्मदर हवा तसा वाढलेला नाही. गेल्या सात वर्षांत जन्मदराची टक्केवारी जवळपास स्थिरच असून २०१७ मध्ये मुलांच्या तुलनेत सरासरी ९३ टक्के इतकीच आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात नागपूर महानगरपालिकेकडे जन्म, मृत्यूसंदर्भात विचारणा केली होती. १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपुरात किती मुला-मुलींचा जन्म झाला, या कालावधीत नागपुरात किती मृत्यू झाले तसेच उपजत मृत्यूचे प्रमाण किती होते, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०११ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत ३ लाख ९४ हजार ६४२ जन्म झाले. यात मुलांच्या जन्माची संख्या २ लाख ३ हजार ८२६ इतकी होती. तर मुलींचा आकडा १ लाख ९० हजार ८१६ एवढा होता. सरासरी मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण हे ९३.६१ टक्के एवढे होते.दरवर्षीची टक्केवारी लक्षात घेतली तर २०१५ मध्ये मुलांच्या तुलनेत ९४.८३ टक्के मुलींचा जन्म झाला. इतर सर्व वर्ष टक्केवारी ही ९३ व ९४ टक्क्यांच्या मध्येच होती. २०१७ मध्ये मुलांच्या प्रमाणात ९३.३९ टक्के मुलींचा जन्म झाला.सव्वा लाखांहून अधिक मृत्यू२०११ पासून सात वर्षांच्या कालावधीत नागपूर मनपाच्या आरोग्य विभागातर्फे १ लाख ७६ हजार ७५५ मृत्यूंची नोंद करण्यात आली. यात १ लाख ६ हजार २४६ पुरुष व ७० हजार ५०९ महिलांचा समावेश होता. २०१७ मध्ये सर्वाधिक २७ हजार ११२ मृत्यूंची नोंद करण्यात आली.सहा हजारांहून अधिक उपजत मृत्यूंची नोंददरम्यान, २०११ ते २०१७ या कालावधीत शहरात एकूण ६ हजार ४१५ उपजत मृत्यूची प्रकरणे आढळून आली. २०१३ मध्ये १ हजार ९०० उपजत मृत्यूंची नोंद झाली. २०१४ मध्ये १,७३५ तर २०१५ मध्ये १,६११ मृत्यू नोंदविण्यात आले. २०१६ पासून ही आकडेवारी घटली असून २०१६ मध्ये ३२६ तर २०१७ मध्ये १७७ उपजत मृत्यू झाले.

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकारFemale Foeticideस्त्रीभ्रूणहत्या