शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

नागपुरात मुलींचा जन्मदर वाढणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 21:34 IST

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मुलींचा जन्मदर हवा तसा वाढलेला नाही. मागील चार वर्षांत जन्मदराच्या टक्केवारीत चढउतार दिसून आले. मात्र हवी तशी वाढ झालेली नाही. २०१८ मध्ये मुलींच्या जन्माची मुलांच्या तुलनेत सरासरी ९४ टक्के इतकीच होती. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देमुलांच्या प्रमाणात ९४ टक्के मुलींचा जन्म : मनपाच्या आरोग्य विभागाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मुलींचा जन्मदर हवा तसा वाढलेला नाही. मागील चार वर्षांत जन्मदराच्या टक्केवारीत चढउतार दिसून आले. मात्र हवी तशी वाढ झालेली नाही. २०१८ मध्ये मुलींच्या जन्माची मुलांच्या तुलनेत सरासरी ९४ टक्के इतकीच होती. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात नागपूर महानगरपालिकेकडे जन्म, मृत्यूसंदर्भात विचारणा केली होती. १ जानेवारी २०१५ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपुरात किती मुला-मुलींचा जन्म झाला, या कालावधीत नागपुरात किती मृत्यू झाले तसेच उपजत मृत्यूचे प्रमाण किती होते, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत शहरात २ लाख २८ हजार १४ जन्म झाले. यात मुलांच्या जन्माची संख्या १ लाख १७ हजार ६५३ इतकी होती. तर मुलींचा आकडा १ लाख १० हजार ३६१ एवढा होता. मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण हे सरासरी ९३.८० टक्के इतके होते.दरवर्षीची टक्केवारी लक्षात घेतली तर २०१५ मध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर ९४.७७ टक्के इतका होता. त्यानंतर २०१६ मध्ये हा आकडा ९३.०४ वर गेला. २०१७ मध्ये ९३.३९ तर २०१८ मध्ये जन्मदर ९३.९९ इतका होता. २०१८ मध्ये १ लाख १० हजार ३६१ मुला-मुलींचा जन्म झाला.सव्वा लाखांहून अधिक मृत्यू२०१५ पासून चार वर्षांच्या कालावधीत नागपूर मनपाच्या आरोग्य विभागातर्फे १ लाख ८ हजार ८६७मृत्यूंची नोंद करण्यात आली. यात ६५ हजार ८०८ पुरुष व ४३ हजार ५९ महिलांचा समावेश होता. २०१८ मध्ये २९ हजार १९५ मृत्यूंची नोंद झाली.दाखले जारी करण्याचे प्रमाण वाढले२०१५ पासून चार वर्षांत जन्म व मृत्यूंची एकूण संख्या ही ३ लाख ३६ हजार ८८१ इतकी होती. मात्र एप्रिल २०१५ पासून २०१८ सालापर्यंत तब्बल ६ लाख ९५ हजार ४९६ दाखले जारी करण्यात आले. २०१५-१६ मध्ये २ लाख २१ हजार २४४, २०१६-१७ मध्ये २ लाख ३३ हजार ३४७ तर २०१७-१८ मध्ये २ लाख ४० हजार ९०५ दाखले लोकांना देण्यात आले. यातील १ लाख १० हजार ५०३ दाखले हे तत्काळ स्वरुपाचे होते. २०१८ मध्ये एकही दाखला प्रलंबित नव्हता. अनेकांनी त्वरित दाखले न घेता काही काळ उशिराने दाखले घेतल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

 

टॅग्स :Female Foeticideस्त्रीभ्रूणहत्याRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता