शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

नागपूर विद्यापीठ; अभियांत्रिकीला नवीन अभ्यासक्रम कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 11:29 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा अभ्यासक्रम अद्यापही ‘अपडेट’ झालेला नाही.

ठळक मुद्दे दोन वर्षांअगोदरची ‘मॉडेल’ अभ्यासक्रम लागू करण्याची घोषणा कागदावरच

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा अभ्यासक्रम अद्यापही ‘अपडेट’ झालेला नाही. ‘एआयसीटीई’च्या निर्देशानुसार विद्यापीठाने दोन वर्षांअगोदरच ‘मॉडेल’ अभ्यासक्रम लागू करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र अद्यापही अभ्यासक्रम बदलाच्या प्रस्तावाला विद्वत् परिषदेत मांडण्यात आलेले नाही. त्यातच तयार केलेला प्रस्ताव नवीन शैक्षणिक धोरणाच्या चौकटीत कितपत बसेल यावरदेखील विचारमंथन झालेले नाही. त्यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तीन वर्षांअगोदर ‘एआयसीटीई’ने पदवी, पदव्युत्तर अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रम ‘अपडेट’ करणे आणि नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल घडविण्याकरिता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सहा प्रमुख अभियांत्रिकी शाखांसाठी देशातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञांची समिती गठित केली होती. त्यानुसार नागपूर विद्यापीठातदेखील अभियांत्रिकीच्या नवीन अभ्यासक्रमासंदर्भात पावले उचलण्यात आली होती. आॅगस्ट २०१८ मध्ये झालेल्या विद्वत् परिषदेत या मुद्यावर विचारणादेखील झाली होती. यासाठी नियमावलीदेखील तयार करण्यात येत आहे. अभ्यास मंडळासमोर हा प्रस्ताव मांडण्यात येईल व २०१९ च्या शैक्षणिक सत्रापासून ‘मॉडेल’ अभ्यासक्रम लागू करण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी केली होती.

मात्र त्यानंतर दोन वर्ष उलटून गेल्यावरदेखील विद्यापीठात नवीन अभ्यासक्रम लागू झालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभ्यासक्रमाचे प्रारूप तयार झाले आहे. अभ्यास मंडळांच्या बैठकीत त्यावर चर्चादेखील झाली आहे. मात्र यासंदर्भातील प्रस्ताव अद्यापही विद्वत् परिषदेसमोर मांडण्यात आलेला नाही. त्यामुळे येत्या सत्रापासूनदेखील नवीन अभ्यासक्रम लागू करणे ही कठीणच बाब दिसून येत असल्याची माहिती विद्यापीठातील एका ज्येष्ठ प्राधिकरण सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.नवीन शैक्षणिक धोरणाचे काय?अभियांत्रिकीच्या नवीन अभ्यासक्रमाला विद्वत् परिषदेत मान्यता मिळाली तरी व्यवस्थापन परिषदेचीदेखील मंजुरी घ्यावी लागणार आहे. देशात नवीन शैक्षणिक धोरण लागू झाले आहे. त्यातील तरतुदीनुसार अभियांत्रिकीचा अभ्यासक्रमदेखील ‘मल्टिडिसिप्लिनरी’ राहणार आहे. विद्यापीठाला त्या अनुषंगानेदेखील विचार करावा लागणार आहे. शिवाय नवीन तरतुदींच्या धोरणांचा विचार न करता प्रस्ताव मंजूर केला तर पुढील तीन ते चार वर्ष परीक्षेची नवीन ‘स्कीम’ बदलता येणार नाही. तसेच अभ्यासक्रमातदेखील मोठे बदल करता येणार नाही. 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र