शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

नागपूर जिल्हा बँकेचे १५६ कोटी केदार कधी परत करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 10:34 IST

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १५६ कोटी नुकसान सावनेरचे आमदार सुनील केदार कधी भरून देणार, हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १५६ कोटी नुकसान सावनेरचे आमदार सुनील केदार कधी भरून देणार, हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.सुनील केदार १९९९ ते २०१२ या काळात नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. या काळात केदार यांनी सरकारी कर्जरोख्यांमध्ये बँकेचे पैसे गुंतविण्याचा सपाटा लावला. २००२ च्या जानेवारी महिन्यात केदार यांनी पाच शेअर दलाल कंपन्यांना १२४.६० कोटी कर्जरोखे घेण्यासाठी दिले. दलालांनी बँकेला हे कर्जरोखे दिले नाही व शेवटी केदारांच्या अव्यापारेषू उपद्व्यापामुळे नागपूर जिल्हा बँक बंद पडायच्या बेतात आहे.या घोटाळ्यासाठी ३ मे २००२ रोजी केदार यांना सीआयडीने अटकही केली होती व ९ आॅगस्ट २००२ पर्यंत केदार नागपूरच्या जेलमध्ये होते. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. या रोखे घोटाळ्याचा तपास करून सीआयडीने सुनील केदार, जिल्हा बँकेचे महाव्यवस्थापक अशोक चौधरी, लेखा अधिकारी सुरेश पेशकर, होम ट्रेड सिक्युरिटीज वाशीचे अध्यक्ष संजय अग्रवाल, संचालक सुबोध भंडारी, गिल्टराज मॅनेजमेंटचे अध्यक्ष केतन सेठ, सिंडीकेट मॅनेजमेंटचे संचालक अमित वर्मा, सेंच्युरी डीलर्सचे संचालक श्रीप्रकाश पोद्दार, इंद्रमणी मर्चंटस्चे संचालक महेंद्र अग्रवाल, होम ट्रेडचे कंपनी सेक्रेटरी एन. एस. त्रिवेदी व होम ट्रेडच्या गुंतवणूक अधिकारी कन्नन मेवावाला, अशा ११ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. गेल्या १७ वर्षांपासून हा खटला न्यायदंडाधिकारी कोर्टात प्रलंबित आहे.या महाघोटाळ्याची चौकशी सहकार खात्याचे विशेष अंकेक्षक यशवंत बागडे यांनी केदार यांच्या दबावाला न जुमानता पूर्ण केली. सुनील केदार हे या घोटाळ्यासाठी पूर्णत: जबाबदार असल्याने त्यांच्याकडून १५६ कोटी व २००२ पासून आजपर्यंतचे १२ टक्के दरसाल व्याज वसूल करावे, असा आदेश दिला आहे. आज ही रक्कम ४०० कोटीपेक्षा अधिक झाली आहे.सुनील केदारांच्याच सावनेर मतदार संघातील कार्यकर्ते ओमप्रकाश कामडी यांनी हा खटला दररोज सुनावणी घेऊन केदार यांच्याकडून १५६ कोटी व व्याज वसूल करावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने हा खटला एक महिन्यात निकाली काढावा, असा आदेश मे २०१९ मध्ये दिला आहे. एवढे होऊनही केदारांविरुद्धचा खटला न्यायदंडाधिकारी कोर्टात दररोज सुनावणीसाठी आला नाही. आता गेल्या १७ वर्षांत हा खटला चालविणाऱ्या सर्व न्यायदंडाधिकाऱ्यांविरुद्ध कोर्टाचा अवमान केल्याची कारवाई होणार असल्याची चर्चा आहे.दरम्यान, २००२ सालापासून नागपूर जिल्हा बँक आर्थिक संकटाशी झुंजत आहे. आज बँकेजवळ शेतकºयांना कर्ज देण्यासाठीच नव्हे तर कर्मचाºयांचे पगार देण्यासाठीही पैसाच नाही. त्यामुळे केदारांकडील रक्कम त्वरित वसूल होणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :MONEYपैसा