शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ओपीडीचा गोंधळ संपणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:49 IST

रुग्णांची वाढती संख्या व रुग्ण हिताला प्राधान्य देऊन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध विभागांच्या बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) दिवस बदलविण्यात आले. तसेच सोईसाठी ओपीडीच्या रचनेतही बदल करण्यात आले. परंतु रुग्ण संख्येत वाढ झाल्याने ओपीडीची जागा अपुरी पडत आहे. नोंदणी कक्षाची रांग, तपासणीच्या प्रतीक्षेत बसलेले रुग्ण आणि औषधे घेणाऱ्यांची लांबच लाब रांग एकाच ठिकाणी येत असल्याने गोंधळ उडत आहे. विशेष म्हणजे, गंभीर आजाराच्या रुग्णांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागत आहे.

ठळक मुद्देअपुरी जागा ठरत आहे कारण : रुग्णांना तासन्तास रहावे लागते रांगेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रुग्णांची वाढती संख्या व रुग्ण हिताला प्राधान्य देऊन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध विभागांच्या बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) दिवस बदलविण्यात आले. तसेच सोईसाठी ओपीडीच्या रचनेतही बदल करण्यात आले. परंतु रुग्ण संख्येत वाढ झाल्याने ओपीडीची जागा अपुरी पडत आहे. नोंदणी कक्षाची रांग, तपासणीच्या प्रतीक्षेत बसलेले रुग्ण आणि औषधे घेणाऱ्यांची लांबच लाब रांग एकाच ठिकाणी येत असल्याने गोंधळ उडत आहे. विशेष म्हणजे, गंभीर आजाराच्या रुग्णांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागत आहे.मध्यभारतात केवळ नागपुरात सुपर स्पेशालिटी हॉपिटल आहे. यामुळे विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. सध्या या हॉस्पिटलमधून हृदय शल्यचिकित्सा, (सीव्हीटीएस), हृदयरोग (कार्डिओलॉजी), मेंदूरोग (न्यूरोलॉजी), मज्जातंतूची शल्यक्रिया (न्युरोसर्जरी), मूत्रपिंड विकार (नेफ्रालॉजी), मूत्र रोग (युरोलॉजी), पोटाचे विकार (गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी) व ‘एन्डोक्रेनॉलॉजी’ अशा आठ विभागातून रुग्णसेवा दिली जाते. परंतु या विभागाच्या बाह्यरुग्णाची (ओपीडी) वेळ सकाळी ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत असल्याने आणि प्रत्येक विभागाच्या ओपीडी आठवड्यातून दोनच दिवस असल्याने त्या-त्या दिवशी रुग्णांची प्रचंड गर्दी होते. एखाद्या दिवसाला शासकीय सुटी आल्यास त्या विभागाच्या दुसऱ्या दिवसाला तर बाह्यरुग्ण विभागाच्या परिसरात पाय ठेवायला जागा राहत नाही. जसे, सोमवारी महाशिवरात्रीची सुटी आल्याने गुरुवार ७ मार्च रोजी रुग्ण व नातेवाईकांची प्रचंड गर्दी उसळली. औषधांसाठी लागणारी रांग ‘सिटी स्कॅन’ विभागापर्यंत पोहचली होती तर नोंदणी कार्ड काढणाऱ्यांची रांग ही खासगी औषधालयापर्यंत लागली होती. ओपीडीची वेळ संपायला आली तरी रांग मात्र कायम होती. विशेष म्हणजे, औषधांच्या रांगेत ज्येष्ठ नागरिक व सामान्य नागरिकांची एकच रांग राहते. येथे बसण्याचीही सोय नाही. यामुळे रुग्णांना अडचणीचे जात आहे. याची जाणीव रुग्णालय प्रशासनाला आहे, परंतु काय उपाययोजना कराव्यात हा प्रश्न त्यांच्या समोरही असल्याचे दिसून येते.गंभीर रुग्णांना फटकारुग्णांची वाढती गर्दी लक्षात घेऊन व रुग्णहिताच्या दृष्टीने आठही विभागाचे ओपीडीचे दिवस बदलविण्यात आले. ओपीडीच्या रचनेतही बदल करण्यात आले. परंतु त्यानंतरही ओपीडीची जागा अपुरी पडत आहे. एकाच ठिकाणी रुग्णांची गर्दी वाढल्याने कुणाचा नंबर आला याची माहिती रुग्णांपर्यंत पोहचत नाही. परिणामी, रुग्णारुग्णांमध्ये भांडणे वाढली आहेत. गंभीर रुग्णांना याचा फटका बसत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnagpurनागपूर