शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

मोदी, शाह येतात तेव्हा गडकरी गायब असतात

By कमलेश वानखेडे | Updated: September 25, 2024 17:30 IST

Nagpur : विजय वडट्टेवारी यांनी काढले भाजपला चिमटे

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह हे जेवढ्या वेळा विदर्भात येतील तेवढे भाजपचे नुकसान होईल. नशीब लोकसभेत ते नागपूरला नाही आले, नाही तर नितीन गडकरी हरले असते. मोदी, शहा जेव्हा येतात तेव्हा गडकरी गायब असतात. भाजपचे पाय खोलात गेले ते आता बाहेर काढू शकत नाही, असे चिमटे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांना काढले.

बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आता आमच्या कडे इंकमिंग सुरू होत आहे. महायुतीकडे अवकाळी पावसाची झळ पोहोचणार आहे. भाजपची धुरा नागपूरच्या लोकांकडे असली की आम्ही बिनधास्त राहू. कारण या लोकांना जनतेनी नाकारले आहे, असेही त्यांनी सांगितले. सरकारला लाडकी बहीण नाही, लाडकी सत्ता आहे. माझा लाडका मतदार आहे, हे त्यांच्या आमदाराच्या मुखातून स्पष्ट झाले आहे.

कायद्यात बदल करा आणि भर चौकात एन्काऊंटर कराबदलापूर प्रकरणातील आरोपीचा बेकायदा एन्काऊंटर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खासदार श्रेय घेत आहे. भाजप आणि संघ कार्यकर्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. संस्था चालक घरी बसून आराम करत आहे, पोलीस सांगतात फरार आहे. संस्था चालक आरएसएसचे प्रमुख व्यक्ती असल्याने त्यांना अटक झाली नाही. कारवाई केली नाही. हे प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी