शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैयाकुमार कार्यकर्त्यांवरच संतापतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 18:21 IST

मानकापूर क्रीडा संकुलात आयोजित ‘संविधान जागर’कार्यक्रमासाठी नागपुरात आलेला जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार हा तसा तर विद्यार्थी चळवळीत समोर आलेला आहे. मात्र बहुतेक प्रसिद्धी मिळत असल्याने तो तळागाळातील जुळलेल्या कार्यकर्त्यांहून स्वत:ला मोठा समजायला लागला आहे. नागपुरात याचेच प्रत्यंतर आहे. न झालेल्या पत्रकारेच्या ठिकाणी त्याच्या सुरक्षेसाठी कडे केलेल्या कार्यकर्त्यांवरच तो केवळ धक्का लागला म्हणून संतापला. त्याच्या रौद्रावतारामुळे कार्यकर्तेदेखील अचंबित झाले.

ठळक मुद्देप्रसार माध्यमांशी बोलणे टाळले : रौद्रावतारामुळे कार्यकर्तेदेखील अचंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानकापूर क्रीडा संकुलात आयोजित ‘संविधान जागर’कार्यक्रमासाठी नागपुरात आलेला जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार हा तसा तर विद्यार्थी चळवळीत समोर आलेला आहे. मात्र बहुतेक प्रसिद्धी मिळत असल्याने तो तळागाळातील जुळलेल्या कार्यकर्त्यांहून स्वत:ला मोठा समजायला लागला आहे. नागपुरात याचेच प्रत्यंतर आहे. न झालेल्या पत्रकारेच्या ठिकाणी त्याच्या सुरक्षेसाठी कडे केलेल्या कार्यकर्त्यांवरच तो केवळ धक्का लागला म्हणून संतापला. त्याच्या रौद्रावतारामुळे कार्यकर्तेदेखील अचंबित झाले.वास्तविक नियोजित कार्यक्रम पत्रिकेत दुपारी १ वाजता पत्रकार परिषद व जेवणाची वेळ नमूद होती. परंतु एक तास उशिरा पोहचल्यानंतरही कन्हैयाने ऐनवेळी प्रसार माध्यमांशी बोलण्याला साफ इन्कार केला. संबंधित कार्यालयात गर्दीमुळे एका कार्यकर्त्याचा धक्का लागल्याने कन्हैया त्याच्यावर संतापला. त्याच्यापासून दूर राहण्यास बजावले. कन्हैयाची वागणूक बघून त्याला भेटण्यासाठी आलेले कार्यकर्ते, समर्थक व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी अचंबित झाले. सर्वांना एका युवा नेत्याकडून अशा वर्तणुकीची अपेक्षा नव्हती. चळवळीतून आलेला हा नेता एका छोट्या कारणामुळे त्याच्याच विचारधारेच्या कार्यकर्त्यांवर ओरडतो हे चुकीचे आहे, अशी संतप्त भावना तेथे उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.कन्हैयाकुमारच्या नागपूर दौऱ्याचा कार्यक्रम भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आधीच निश्चित केला होता. त्यानुसार दुपारी १ ते २ वाजेदरम्यान बजाजनगर येथील लॉनमध्ये पत्रकार परिषद व जेवण करणार होता.कन्हैयाची पत्रकार परिषद असल्याने प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी दुपारी १ च्या सुमारास एका सामाजिक संस्थेच्या कार्यालयात पोहचले. मात्र कन्हैयाने आयोजकांवरच नाराजी व्यक्त करत प्रसार माध्यमांशी बोलण्याला साफ नकार दिला. वास्तविक आयोजकांनी निर्धारित कार्यक्रमात पत्रकार परिषदेचा समावेश असल्याने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले होते. कन्हैयामुळे आयोजकांचीही कोंडी झाली. पत्रकारांना कन्हैयाची एक तास प्रतीक्षा करावी लागली. दुपारी २ च्या सुमारास उशिरा पोहचूनही बोलण्यास नकार दिल्याने पत्रकारांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारnagpurनागपूर