शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रामटेक गडमंदिराचे अडीच कोटी कधी देता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 14:01 IST

रामटेक येथील गडमंदिराच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने ७ कोटी रुपये मंजूर केले असून त्यापैकी अडीच कोटी रुपये देणे बाकी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही रक्कम कधीपर्यंत अदा करता, अशी विचारणा शासनाला केली आहे. तसेच, यावर तीन आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाची विचारणा : शासनाला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रामटेक येथील गडमंदिराच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने ७ कोटी रुपये मंजूर केले असून त्यापैकी अडीच कोटी रुपये देणे बाकी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही रक्कम कधीपर्यंत अदा करता, अशी विचारणा शासनाला केली आहे. तसेच, यावर तीन आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार विकासकामांच्या प्रगतीवर प्रतिज्ञापत्र सादर करून गडदुरुस्तीचे काम एक वर्षात पूर्ण करण्याची ग्वाही दिली. श्रीराम व लक्ष्मण मंदिराच्या पश्चिम भागाकडील गड ढासळत आहे. त्यामुळे मंदिराला धोका निर्माण झाला आहे. परिणामी, हा गड तात्काळ दुरुस्त करणे आवश्यक झाले आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. तसेच, काम कठीण असल्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. याप्रकरणात वरिष्ठ वकील आनंद जयस्वाल न्यायालय मित्र असून शासनातर्फे अ‍ॅड. दीपक ठाकरे तर, रामटेक नगर परिषदेतर्फे अ‍ॅड. महेश धात्रक यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTempleमंदिर