शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सिंचन कॅनल्स कधीपर्यंत पूर्ण करता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 21:52 IST

विदर्भात सध्या कोणकोणत्या सिंचन कॅनल्सचे बांधकाम अपूर्ण आहे व ते बांधकाम कधीपर्यंत पूर्ण केले जाईल अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली असून यावर उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून ८ आॅगस्टपर्यंत वेळ दिला आहे. तसेच, २०१४ पासून आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कृषी पंप व वीज जोडण्या दिल्या आणि किती शेतकऱ्यांचे याबाबतचे अर्ज प्रलंबित आहेत याची माहितीही न्यायालयाने सरकारला मागितली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाची विचारणा : सरकारला उत्तरासाठी दिली शेवटची संधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात सध्या कोणकोणत्या सिंचन कॅनल्सचे बांधकाम अपूर्ण आहे व ते बांधकाम कधीपर्यंत पूर्ण केले जाईल अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली असून यावर उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून ८ आॅगस्टपर्यंत वेळ दिला आहे. तसेच, २०१४ पासून आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कृषी पंप व वीज जोडण्या दिल्या आणि किती शेतकऱ्यांचे याबाबतचे अर्ज प्रलंबित आहेत याची माहितीही न्यायालयाने सरकारला मागितली आहे.न्यायालयाने वर्तमानपत्रांतील बातम्यांची दखल घेऊन विदर्भातील कृषी अनुशेषाविषयी २०१४ मध्ये स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. परंतु, या प्रकरणात सरकारने अद्याप समाधानकारक उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. याचिकेतील सर्व प्रश्न जनहिताचे आहेत. सरकारने त्याला विरोध करण्यास काहीच अर्थ नाही. उलट सरकारने हे प्रश्न कधीपर्यंत सोडवल्या जातील यावर भूमिका स्पष्ट करायला हवी असे मतही न्यायालयाने व्यक्त केले. तसेच, वरीलप्रमाणे आदेश दिला. विदर्भात ६५ टक्के वीजनिर्मिती होत असली तरी, येथील शेतीला केवळ १४ टक्के वीज मिळते. नागपूर विभागात १०.९० तर, अमरावती विभागात १७.३७ टक्के क्षेत्रालाच वीज पुरवठा होतो. पुणेमध्ये २०.२८ तर, नाशिकमध्ये २०.२८ टक्के क्षेत्रात वीज पुरवठा आहे. हजार हेक्टर कृषीक्षेत्रामागे वीज वापरण्याचे प्रमाण पाहिल्यास पुणे (१८२४.६५ युनिटस्) आघाडीवर आहे. त्यानंतर नाशिक (१७८७.९८ युनिटस्) व मराठवाड्याचा (१०८९.१८ युनिटस्) क्रमांक लागतो. अमरावती विभागात ७०० तर, नागपूर विभागात ४९९.२० युनिटस्चा वापर आहे असा दावा बातम्यांत करण्यात आला होता.कृषिपंपांचा अनुशेष२०१४ पर्यंत विदर्भात ६ लाख ९० हजार ५३१ कृषिपंपांचा अनुशेष होता. कृषिपंप जोडणीचे अर्ज पैसे भरूनही प्रलंबित ठेवण्यात येतात. मार्च २०१४ पर्यंत एकूण ६५ हजार ६४८ अर्ज प्रलंबित होते. त्यापैकी ५५ हजार ४४३ अर्जदारांना पैसे भरूनही जोडणी देण्यात आली नव्हती. २०१३-१४ मध्ये विदर्भात केवळ २५ हजार ८५९ कृषिपंपाना जोडणी देण्यात आली होती.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प