शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

नागपूर जिल्ह्यातील खऱ्या गरजूंना घरकुलाचा लाभ कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:07 AM

उपेक्षित व खऱ्या गरजू कुटुंबांना घरकूल योजनेत शासनाकडून आर्थिक लाभ मिळण्यात प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष काहींना दुहेरी लाभ; गरजूंची प्रतीक्षा कायम

अशोक हटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपेक्षित व खऱ्या गरजू कुटुंबांना घरकूल योजनेत शासनाकडून आर्थिक लाभ मिळण्यात प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अन्यायग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून सन २०११ मध्ये ग्रामीण विकास मंत्रालयाने खऱ्या गरजू लोकांची यादी तयार करण्यासाठी शिक्षकांवर जबाबदारी टाकली व सर्वेक्षण केले. मात्र या यादीतही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांचे नाव नसल्याने खरेच हा सर्वे योग्य पद्धतीने झाला काय, हा प्रश्न आहे. दुसरीकडे काहींना दुहेरी लाभ मिळाल्याने सर्वे चुकीचा व खऱ्या गरजूंवर अन्याय करणाराच झाल्याचे सिद्ध होते. त्यामुळे खऱ्या, उपेक्षितांना न्याय देण्यासाठी पुन्हा जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.अडेगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत कथलाबोडी येथील रहिवासी चंद्रभान कवडूजी कडू दारिद्र्य रेषेखालील यादीमध्ये १५ व्या क्रमांकावर आहेत. त्यांचा फॅमिली आयडी ३२०९ आहे. हे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहे. या कुटुंबीयांनी वारंवार ग्रामसभेत आपल्या हक्काचा विषय ठेवत न्याय देण्याची मागणी केली. या अनुषंगाने ग्रामसभेचा ठराव पंचायत समिती मौदा व ग्रामीण विकास यंत्रणा नागपूर यांना पाठविण्यात आला, अशी माहिती सचिव दर्शना गायकवाड यांनी दिली.परंतु अद्याप त्याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. यावर्षी मार्च २०१८ पर्यंत ५०० घरकुलांचे उद्दिष्ट आहे. मात्र या यादीतदेखील खरे गरजू व दारिद्र्य रेषेखालील कुटुंब वंचित आहे. पंतप्रधान आवास योजनेतही सन २०११ च्या यादीचा विचार करण्यात आला आहे. तर ही यादी खºया गरजूंवर अन्याय करणारी ठरत असल्याने घरकूल योजनेची पुन्हा जबाबदारी निश्चित करून गावकऱ्यांच्या उपस्थितीत यादी करण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

रमाई आवास योजनेतून लाभ द्या!आदिवासींना शबरी योजने अंतर्गत घरकूल देऊन सदर यादीतील भार कमी करण्यात यावा. तसेच रमाई आवास योजनेतून अनुसूचित जाती कुटुंबांना लाभ देण्यात यावा, अशी मागणीही नागरिकांनी केली असून पुन्हा गावकऱ्यांच्या समक्ष सर्वेक्षण करून गरजू लाभार्थ्यांना न्याय देण्यात यावा, अशी वंचित लाभार्थ्यांची मागणी आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास