शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

‘तुम जो मिल गये हो...’ प्रेमगीतांनी रिझविले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:23 IST

खांडेकर ऑकेस्ट्रा व नूपुर संगीत संचातर्फे शनिवारी सायंटिफिक सभागृहात ‘तुम जो मिल गये हो...’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमातील प्रेमगीतांनी श्रोत्यांना अक्षरश: रिझविले. रचना खांडेकर-पाठक यांनी हे शीर्षक गीत सादर करून श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळविली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खांडेकर ऑकेस्ट्रा व नूपुर संगीत संचातर्फे शनिवारी सायंटिफिक सभागृहात ‘तुम जो मिल गये हो...’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमातील प्रेमगीतांनी श्रोत्यांना अक्षरश: रिझविले. रचना खांडेकर-पाठक यांनी हे शीर्षक गीत सादर करून श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळविली.पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा अजरामर आवाज आजही रसिकांच्या मनाचा खोलवर ठाव घेणाराच ठरतो. त्यांच्या गाण्यांची भुरळ आजही रसिकांना तेवढीच मोहून जाते. त्यांनी गायलेली अनेक प्रेमगीते हे आजही तरुणाईला साद घालतात..वेड लावतात. असेच एक गीत म्हणजे फिल्म ‘हसते जख्म’ चित्रपटातील ‘तुम जो मिल गये हो...’. हे आहे. रचना यांनी रफी यांचे गाणे हुबेहुब तालासुरात सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. यानंतर मिलिंद कोरटकर यांनी रफी यांचेच ‘आने से उसके आये बहार’ हे दुसरे प्रेमगीत अतिशय तरलतेने सादर केले. अभय पांडे यांनी सादर केलेल्या ‘दर्दे दिल दर्दे जिगर’ या गीताने श्रोत्यांनाही प्रेयसीच्या आठवणीच्या हिंदोळ्यात हळुवार झुलविले. डॉ. ममता खांडेकर यांनी लताबाई यांनी गायलेल्या प्रेमगीतांचा ‘स्वरगुच्छ’ सादर केला. यात ‘तेरे लिये पलकों की झालर बूनू, तूम सामने बैठे रहो, दूरी ना रहे कोई, कया जानू सजन, मेरे जीवनसाथी कली थी मै तो प्यासी, मेरे दिल में हल्की सी वो खलीश है’ या गीतांचा समावेश होता. मुश्ताक शेख यांनी ‘तेरे नाम’ चित्रपटातील गाजेलेले ‘तुमसे मिलना बाते करना बडा अच्छा लगता है’ या गीतावर श्रोत्यांनाही नादस्वरांवर तरंगवले. ‘आके तेरी बाहों मे, वादा रहा सनम या गीतावर मंत्रमुग्ध केले. पुष्पा जोगे यांनी ‘दिल तो है दिल’ हे गीत सादर केले. अभय पांडे यांनी ‘नीले नीले अंबर पर’ गीत सादर केले. संकल्पना रचना खांडेकर-पाठक यांची होती. संगीत संयोजन रमेश खांडेकर व पवन मानवटकर यांचे होते. उत्कृष्ट निवेदन डॉ. महेश तिवारी यांनी केले. की-बोर्डवर पवन मानवटकर, गिटारवर प्रकाश चव्हाण, ड्रम्सवर अशोक ठवरे, ढोलक व कांगोवर रघुनंदन परसतवार, ऑक्टोपॅडवर अक्षय हर्ले यांनी साथसंगत केली.

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर