शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्रीनंतर ‘तो’ बोगस डॉक्टर मेडिकलमध्ये काय करीत होता ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 19:26 IST

मेडिकलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना स्वत: डॉक्टर असल्याचे सांगून त्यांची दिशाभूल करून आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरला गुरुवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) जवानांनी पकडले. या पूर्वीही या बोगस डॉक्टरला अंगात अ‍ॅप्रॉन व गळ्यात स्टेथेस्कोप टाकून कमी दरात औषधे व रक्त आणून देतो असे सांगून नातेवाईकांना गंडविताना रक्षकांनी पकडून अजनी पालिसांच्या स्वाधीन केले होते. परंतु चार महिन्यातच पुन्हा तीच व्यक्ती समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देएमएसएफ जवानांच्या सतर्कतेने अडकला जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना स्वत: डॉक्टर असल्याचे सांगून त्यांची दिशाभूल करून आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरला गुरुवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) जवानांनी पकडले. या पूर्वीही या बोगस डॉक्टरला अंगात अ‍ॅप्रॉन व गळ्यात स्टेथेस्कोप टाकून कमी दरात औषधे व रक्त आणून देतो असे सांगून नातेवाईकांना गंडविताना रक्षकांनी पकडून अजनी पालिसांच्या स्वाधीन केले होते. परंतु चार महिन्यातच पुन्हा तीच व्यक्ती समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.प्रकाश प्रल्हाद वानखेडे (४०) असे त्या बोगस डॉक्टरचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, १५ दिवसांपूर्वी एका महिलेने एका डॉक्टरवर संशय व्यक्त करून तो रुग्णांसोबत असलेल्या महिलांची दिशाभूल करून मानसिक, शारीरिक व आर्थिक लुबाडणूक करीत असल्याची तक्रार ‘एमएसएफ’ कडे केली होती. या तक्रारीला घेऊन मेडिकलच्या सुरक्षा रक्षकांना अलर्ट करण्यात आले होते. १७ मे रोजी रात्री १.३० वाजताच्या सुमारास मेडिकलच्या वॉर्ड क्र. ३१ समोर एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे सुरक्षा रक्षकांना सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये दिसून आले. रक्षकांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडले असता धक्काच बसला. तीन-चार महिन्यांपूर्वी हाच तरुण अ‍ॅप्रॉन घातलेला, गळ्यात स्टेथेस्कोप ठेवून स्वत:ला डॉक्टर म्हणून मिरवत होता. त्याने कमी दरात औषधे व रक्त उपलब्ध करून देतो असे सांगून एका महिलेकडून पाच हजार रुपये घेतले होते. सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून अजनी पोलिसांच्या हवाली केले होते. परंतु आता पुन्हा तोच तरुण लबाडणूक करीत असल्याचे आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सुत्रानूसार, यावेळी पकडलेल्या बोगस डॉक्टरवर कठोर कारवाई होण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी लेखी तक्रार अजनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ही कारवाई एमएसएफचे वरिष्ठ अधिकारी व सुपरवायझर सनी खरे, अंकुश खानझोडे, ज्ञानेश्वर कुलमथे, गोपीचंद नानवटकर व परमेश्वर डोंगरे यांनी केली.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयCrimeगुन्हा