शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डाव्यांविरोधात संघाची रणनीती काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 01:25 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला ९ मार्चपासून रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरुवात होत आहे. या बैठकीत समाविष्ट होणारे मुद्दे अंतिम झाले आहे. डाव्या विचारसरणीच्या पक्षांविरोधातील रणनीतीवर या सभेत चर्चा होण्याची शक्यता असून संघ परिवाराशी जुळलेल्या संस्थांमध्ये समन्वय वाढावा यावरदेखील मंथन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, देशाच्या विविध भागांतून संघ प्रचारक व ज्येष्ठ स्वयंसेवक रेशीमबागमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देअ.भा. प्रतिनिधी सभेत होणार मंथन सभेची तयारी अंतिम टप्प्यातदेशभरातून प्रतिनिधी पोहोचताहेत संघभूमीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : त्रिपुरा येथील डाव्यांचा गड ढासळल्यानंतर संघ परिवारात उत्साहाचे वातावरण आहे. केरळमधील हिंसेविरोधात संघाने मागीलवर्षी उघडपणे आवाज उठविला व रस्त्यांवर येऊन निदर्शने केली. या पार्श्वभूमीवर अ.भा.प्रतिनिधी सभेत नक्कीच याचे प्रतिबिंब उमटेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. संघात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. यंदा होणाºया अखिल भारतीय सभेत संघाच्या कारभाराची धुरा सांभाळणाºया सरकार्यवाह या पदाची निवड होणार आहे. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या निवड प्रक्रियेत सहभागी होतील. वर्तमान सरकार्यवाह भय्याजी जोशी यांचे वय सत्तरीपार झाले आहे. त्यामुळे तेच सरकार्यवाहपदी कायम राहतील की नाही याबाबत संघ वर्तुळातदेखील साशंकता आहे. सहसरकार्यवाह डॉ.कृष्णगोपाल, दत्तात्रेय होसबळे व व्ही.भागय्या यांच्यापैकी एकाकडे ही जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय प्रतिनिधी सभेतच होणार आहे.या सभेत रिक्त जागादेखील भरण्यात येतील, तसेच संघटनविषयक बाबींसह सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. संघाचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रांचा विकास करण्यासाठी उपाययोजनांसंदर्भात या सभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत भारतीय किसान संघ, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष यांच्यासह संघ परिवारातील ३५ संघटनांचे १,४०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सभेत मांडण्यात येणाºया प्रस्तावांवर त्यांच्या उपस्थितीत चर्चा होईल. याचप्रमाणे विविघ संघटनांचे प्रतिनिधी त्यांच्या कामाचा लेखाजोगा संक्षिप्तपणे मांडतील.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर