शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या अधिकारावर मनपा आयुक्तांकडून गदा कशासाठी? आयुक्तांच्या प्रस्तावामुळे पदाधिकारी संतप्त

By गणेश हुड | Updated: May 5, 2023 18:16 IST

Nagpur News मनपा आयुक्तांनी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांचे पर्यवेक्षण व सनियंत्रणाचे अधिकार नागपूर महानगरपालिकेकडे द्यावे, अशा आशयाचा प्रस्ताव राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला पदाधिकारी व कर्मचारी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

गणेश हूड नागपूर :   ७३ व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थांना राज्य घटनेने अधिकार बहाल केले आहेत. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी जिल्हा परिषदेवर टाकण्यात आली आहे. असे असतानाही मनपा आयुक्तांनी शहरातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांचे पर्यवेक्षण व सनियंत्रणाचे अधिकार नागपूर महानगरपालिकेकडे द्यावे, अशा आशयाचा प्रस्ताव राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला पदाधिकारी व कर्मचारी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला असून जि.प.च्या अधिकारावर आयुक्तांकडून गदा कशासाठी? असा सवाल केला आहे.

नागपूर शहरासह जिल्हयातील सर्व प्रकारच्या शाळांवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे नियंत्रण आहे. सद्यस्थितीत नागपूर महानगपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी अनुदानित शाळा, बिना अनुदानित शाळा, कायम विना अनुदानित शाळा, संच मान्यता, आरटीई मान्यता प्रमाणपत्र देणे व नूतनीकरण करणे, शाळांची मान्यता काढणे, आदींचे अधिकार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचेकडे आहे. तसेच खाजगी शिक्षक मान्यता, माध्यमिक शाळा अनुदान निश्चिती वितरण, माध्यमिक शाळांची मान्यता काढणे, वार्षिक तपासणी, तुकड्यांना मान्यता देण्याचे अधिकारही  माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचेकडे आहे.  हे जिल्हा परिषदेचे अधिकार काढून महापालिककडे देण्यात यावे, अशी मागणी आयुक्तांनी शासनाकडे केली आहे. 

मात्र हा प्रस्ताव जि.प.च्या अधिकारांचे हनन करणारा आहे. या प्रस्तावामागे राजकीय षडयंत्र आहे. असा आरोप जि.प.पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आयुक्तांच्या प्रस्तावाला विरोध दर्शविण्यासाठी जि.प.च्या शिक्षण समिती, स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत प्रस्ताव करून शासनाकडे पाठविला जाणार आहे. तसेच आयुक्तांच्या प्रस्तावाचा निषेध करणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. अधिकारावर अतिक्रमण खपवून घेणार नाही पंचायत राज संस्थांना राज्य घटनेने अधिकार बहाल केले आहेत. त्यानुसार जि.प.ला अधिकार बहाल करण्यात आले आहे. असे असतानाही मनपा आयुक्तांनी शासनाकडे प्रस्ताव म्हणजे जि.प.च्या अधिकारावर अतिक्रमण होय. जिल्हा परिषदेच्या काही शाळा जरी महानगरपालिकेच्या हद्दीत येत असतील तरी देखील त्या शाळांवर जिल्हा परिषदेचे उत्तम असं नियोजन आणि नियंत्रण आहे त्यामुळे आम्ही जिल्हा परिषदेची मालमत्ता असलेली कुठलीही शासकीय जागा महानगरपालिकेला देणार नाही.मुक्ता कोकड्डे, अध्यक्ष,जि.प.

हे तर जि.प.च्या अधिकाराचे हननमनपा आयुक्तांचा प्रस्ताव हा जि.प.च्या अधिकारांचे हनन करणारा आहे. ७३ व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थांना राज्य घटनेने अधिकार बहाल केले आहेत. त्यानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर जि.प.चे नियंत्रण आहे. या प्रस्तावा विरोधात जि.प.च्या सर्वसाधारण सभेत ठराव पारीत केला जाईल. आयुक्तांच्या प्रस्तावाला आमचा तीव्र विरोध आहे.-कुंदा राऊत, उपाध्यक्ष, जि.प.प्रस्तावाविरोधात आंदोलन करु जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे असलेले अधिकार महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात येऊ नये असे निवेदन राज्य शासनाचे शालेय शिक्षण मंत्री यांचेकडे कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे सादर केले आहे. आयुक्तांचा प्रस्ताव मान्य नसून या विरोधात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांचे नेतृत्वात आंदोलन करू.-डॉ सोहन चवरे,जिल्हाध्यक्ष ,कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना. 

टॅग्स :zpजिल्हा परिषद