शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीच्या साहित्य घोटाळ्यातील कंत्राटदाराला क्लीनचीट कशासाठी?

By गणेश हुड | Updated: May 21, 2024 21:02 IST

तीन सदस्यीय चौकशी समितीच्या अहवालात कंत्राटदाराचा उल्लेखच नाही. 

नागपूर : जिल्हा परिषदेतील अंगणवाड्यांना एक कोटी ६ लाख रुपयांच्या साहित्य  पुरवठ्यात अनियमिता झाली आहे. प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी न घेता साहित्य वाटप करण्यात आले आहे.सकृतदर्शनी  उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व १३ सीडीपीओ सकृदर्शनी दोषी असल्याचा ठपका चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालात ठेवण्यात आला आहे. परंतु या प्रकरणात अधिकाऱ्यांप्रमाणे दोषी कंत्राटदारांवर कारवाई होणे अपेक्षित असताना त्याच्या नावाचा कुठेच उल्लेख नसल्याने कंत्राटदाराला क्लीन चीट कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

 प्राथमिक अहवालात काही त्रुटी असल्याने सुधारित अहवाल सादर  करण्याचे निर्देश चौकशी समिती अध्यक्षा तथा मुख्य वित्त व लेखा अधिकारी (कॅफो) कुमुदिनी श्रीखंडे यांच्या त्रिसदस्यीय समितीला अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिले. तसेच सुधारित अहवालानंतर या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून साहित्य वाटपावर झालेला खर्च वसुल करण्यात यावा असेही निर्देश देण्यात आले. परंतु साहित्याचा पुरवठा करण्यापूर्वीच ९६ लाख रुपयांचे बील उचलणारा कंत्राटदार कोण आहे. कुठल्या संस्थेला साहित्य पुरवठ्याचा कंत्राट देण्यात आला होता. याचा साधा उल्लेखही प्राथमिक अहवालात करण्यात आलेला नाही. यामुळे जिल्हा परिषदेत उलटसुलट चर्चा आहे. 

केंद्र सरकारच्या जीईएम या पोर्टलद्वारेच यापुढे खरेदी न करता प्रकल्प स्तरावरील या  योजनेतील साहित्याची दरपत्रकाच्या माध्यमातून पुरवठादाराची निवड करून खरेदी करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या पुरवठादारांच्या दरपत्रकात सारखेपणा आहे. वरिष्ठ स्तरावरुन खरेदीची प्रक्रीया ‘मॅनेज’ करण्यात आल्याची शक्यता प्राथमिक चौकशी अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

टॅग्स :nagpurनागपूर