शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘चाय पे चर्चा’त दिलेल्या आश्वासनांचे काय झाले?; शिवाजीराव मोघे यांचा मोदी सरकारला सवाल

By कमलेश वानखेडे | Updated: March 4, 2024 20:12 IST

मोदी सरकारने शेतकरी व जनतेला उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

नागपूर : २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथे ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम घेत १८ आश्वासने दिली होती. मात्र, मागील दहा वर्षांत त्यातील एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. आधी याचे उत्तर मोदी सरकारने द्यावे, अशी मागणी अ. भा. आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

मोघे म्हणाले, यवतमाळ, चंद्रपूर आणि आदिलाबाद जिल्ह्यातील पाच लाख एकर जमिनीला पाणी देऊन परिसराचा सर्वांगीण विकास करणारा निम्न पैनगंगा प्रकल्प केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे २०१४ पासून बंद पडला आहे. कापूस पिकणाऱ्या भागातच जिनिंग, स्पीनिंग कापूस कापड बनविण्यापर्यंतचे प्रकल्प उभारण्यात येणार होते. ते झाले नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्या मजबूत करण्याऐवजी त्या कमकुवत करण्याची धोरणे आखली जात आहेत. या सर्व प्रश्नांवर मोदी सरकारने शेतकरी व जनतेला उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

यवतमाळमधून लढण्यास इच्छुक- २०१४ मध्ये आपण यवतमाळमधून पक्षाकडे तिकिटाची मागणी केली नव्हती. पक्षाच्या निवडणूक समितीकडेही अर्ज केला नव्हता. तरीही अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी आपली उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी आपण निवडणूक लढण्यास इच्छुक आहोत. महाविकास आघाडीत ही जागा उद्धव ठाकरे गटानेही मागितली आहे. ही जागा काँग्रेसला सुटली तर आपली लढण्यास तयारी आहे, असेही मोघे यांनी स्पष्ट केले.

कपाळावर बंदूक लावली जात आहे

- देशभरात जे काही सुरू आहे तेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बाबतीत घडले आहे. कपाळावर बंदूक लावली जात आहे. त्यामुळे अनेकांना निर्णय घ्यावा लागत आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांची स्वतःची ताकद आहे. यावेळी त्यांनाही त्यांचे खासदार निवडून आणायचे आहेत. त्यामुळे ते नक्कीच महाविकास आघाडीसोबत येतील, असा विश्वास मोघे यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपमध्ये नेक्स्ट टू पीएम आहेत. त्यामुळे भाजपच्या पहिल्या यादीत त्यांची उमेदवारी जाहीर होणे अपेक्षित होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी