शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील महापालिकेच्या बंद शाळेत सुरू काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:12 IST

महापालिकेने गेल्या काही वर्षात स्वत:च्या ३४ शाळा बंद केल्या आहे. यातील काही शाळांच्या इमारती आजही आहेत. या इमारतीतील शाळा बंद पडल्या असल्यामुळे इमारतीचा उपयोग गुरांच्या गोठ्यासाठी, भंगार साठविण्यासाठी, ठेकेदारांच्या मजुरांना राहण्यासाठी, पार्किंगसाठी, समाजभवन म्हणून उपयोग होत आहे. विशेष म्हणजे शाळांच्या या मोठमोठ्या इमारतीकडे कुणाचेही लक्ष नाही. काही इमारती असामाजिक तत्त्वाचे अड्डे बनल्या आहेत. हुक्का पार्लर इमारतीमध्ये सुरू आहे. बंद पडलेल्या शाळेच्या संदर्भात एका स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने बंद पडलेल्या शाळांची पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार मनपाच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंद पडलेल्या शाळांचे निरीक्षण केले असता, हे सर्व चित्र बघून मनपाच्या शाळांमध्ये सुरू काय, असा सवालच त्यांनी केला.

ठळक मुद्देपरिसरातील लोकांचे अतिक्रमण : गुरांचा गोठा : ठेकेदाराचे अतिक्रमण : भंगाराचे गोदाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेने गेल्या काही वर्षात स्वत:च्या ३४ शाळा बंद केल्या आहे. यातील काही शाळांच्या इमारती आजही आहेत. या इमारतीतील शाळा बंद पडल्या असल्यामुळे इमारतीचा उपयोग गुरांच्या गोठ्यासाठी, भंगार साठविण्यासाठी, ठेकेदारांच्या मजुरांना राहण्यासाठी, पार्किंगसाठी, समाजभवन म्हणून उपयोग होत आहे. विशेष म्हणजे शाळांच्या या मोठमोठ्या इमारतीकडे कुणाचेही लक्ष नाही. काही इमारती असामाजिक तत्त्वाचे अड्डे बनल्या आहेत. हुक्का पार्लर इमारतीमध्ये सुरू आहे. बंद पडलेल्या शाळेच्या संदर्भात एका स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने बंद पडलेल्या शाळांची पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार मनपाच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंद पडलेल्या शाळांचे निरीक्षण केले असता, हे सर्व चित्र बघून मनपाच्या शाळांमध्ये सुरू काय, असा सवालच त्यांनी केला.मनपाच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत अखिल भारतीय दुर्बल समाज विकास संसाधन संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. गोळीबार चौकातील नेताजी सुभाष चंद्र बोस शाळेत त्यांनी भेट दिली असता. येथे केवळ चौथा वर्ग होता. त्यातही चारच विद्यार्थी होते. एक शिक्षिका होती. शाळेची पुरती दुरावस्था झालेली आढळली. जागनाथ बुधवारी येथील बंद पडलेली मराठी कन्या शाळेत जनावरांचा गोठा आढळला. याच इमारतीत ठेकेदाराने कब्जा करून त्याच्या मजुरासाठी वास्तव्य केले होते. हे मजूर ठेकेदाराला पैसेही देत असल्याचे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. बंगाली पंजा येथील २००४ पासून बंद पडलेल्या हिंदी उच्च प्राथमिक शाळेत डेकोरेशनचे साहित्य, परिसरातील लोकांच्या वाहनांची पार्किंग व सामुहिक कार्यासाठी इमारतीचा उपयोग होत असल्याचे आढळले.गरोबा मैदानच्या शाळेत हुक्का पार्लरगरोबा मैदान मराठी प्रा. शाळेतील फळ्यावर हुक्का पार्लरचा दर लिहलेला आहे. त्यामुळे बंद पडलेल्या या इमारतीत असामाजिक तत्त्वांचा अड्डा असल्याचे निदर्शनास आले. या इमारतीत विद्युत यंत्रणा लागलेली आहे. मात्र शालेय साहित्य भंगाराच्या अवस्थेत पडलेले आहे. मस्कासाथ येथील मराठी मुलींच्या शाळेत परिसरातील लोकांनी कब्जा केला आहे. तिथे टालवाल्यांचे लाकूड व भंगारवाल्यांचे साहित्य पडलेले आहे.इमारतीचा दुरुपयोगबंद पडलेल्या शाळांच्या वर्गखोल्या डम्पिंग यार्ड बनल्या आहेत. असामाजिक तत्त्वांनी तिथे अड्डे बनविले आहे. इमारतीचा दुरुपयोग होत आहे. शाळा डम्पिंग यार्ड म्हणून उपयोगात आणल्या जात आहे. सर्वत्र घाण, कचरा, वर्गखोल्यांमध्ये भंगार पडलेल्या टेबल-खुर्च्या असतानाही याकडे कुणाचेही लक्ष नाही. मनपाच्या स्वत:च्या असलेल्या या इमारतीचा वापरसुद्धा केलेला नाही. उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या याचिकेनंतर न्यायालयाने निर्देश दिल्यामुळे याची पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे ही अवस्था मनपाच्या निदर्शनास आली आहे.बंद पडलेल्या शाळेच्या इमारतीचा वापर व्हावामनपाने शाळा बंद करून या इमारती भंगारासारख्या सोडल्या आहेत. शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे व इंग्रजी माध्यमाच्या अट्टाहासापोटी मनपाच्या शाळांची ही अवस्था झाली आहे. या मोठमोठ्या इमारतींची दुरुस्ती करून या इमारतीत पुन्हा अध्यापनाचे कार्य सुरू व्हावे, या भावनेतून अ.भा. दुर्बल समाज विकास संसाधन संस्थेने याचिका दाखल केली होती. बंद पडलेल्या या शाळा पुन्हा सुरू व्हाव्यात, ही अपेक्षा आहे.धीरज भिसीकर, सचिव, अ.भा. दुर्बल समाज विकास संसाधन संस्था

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाSchoolशाळा