शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कामच बंद तर खाणार काय ? रोजगाराच्या विवंचनेत आम्ही जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 11:06 IST

मनपा आयुक्त आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून पुन्हा एकदा टाळेबंदी लागण्याचे संकेत प्राप्त होताच संपूर्ण बाजारात धास्तीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देहातावर पोट भरणाऱ्यांचा सवाल, टाळेबंदी लागण्याच्या संकेताने सगळेच धास्तावले

प्रवीण खापरे, संजय लचुरिया।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तब्बल अडीच-तीन महिन्यांच्या टाळेबंदीनंतर सरकारने बाजारातील व्यवहारात शिथिलता प्रदान केली आणि हातावर पोट असणाऱ्यांसह व्यापारी वर्गाने सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र, मनपा आयुक्त आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून पुन्हा एकदा टाळेबंदी लागण्याचे संकेत प्राप्त होताच संपूर्ण बाजारात धास्तीचे वातावरण पसरले आहे. तीन महिन्यात संपूर्ण अर्थव्यवस्था मोडकळीस आल्यानंतर कसेतरी पोट भरण्याचे प्रयत्न करणाऱ्या वर्गाकडून... ‘आता आम्ही जगायचे कसे?’ असा भयप्रद सवाल उपस्थित केला जात आहे.

मेकॅनिकला गाडी थांबण्याची भीतीसंक्रमण वाढते आहे आणि सरकारकडून जो निर्णय घेतला जाईल, तो मान्य करणेच योग्य ठरेल. मात्र, तीन महिन्याचा काळ आठवला की अजूनही अंगावर काटा उभा राहतो. गाड्या पुन्हा थांबतील आणि माझ्यासारख्या मेकॅनिकला पुन्हा अडचणीत जगावे लागेल, अशी भावना अतुल मेकॅनिकने व्यक्त केली.

दुसरा पर्याय नाही का?रोज कमावतो तेव्हा घराचा रहाटगाडा चालतो. काम नसेल तर कुटुंबाची अवस्था काय असते, याचा अनुभव गेल्या तीन महिन्यात घेतला आहे. आता पुन्हा टाळेबंदी लागली तर काय होईल, याची भीती आहे. टाळेबंदीपेक्षा संसर्ग रोखण्यासाठी दुसरा पर्याय नाही का, असा सवाल इतवारी भागात काम करणारे नरेश मोचीवाला यांनी उपस्थित केला.

उपाशीच मरावे लागेलडे टू डे पुढे भुट्टा विकणाऱ्या भुट्टावाला यांना रोजगाराची चिंता आहे. वातावरणानुसार हंगामी व्यवसाय निवडणाऱ्यात येणारे हे भुट्टेवाले आधीच विक्री होत नसल्याने चिंतेत आहेत. पावसाळा पूर्ण असाच चालला आणि पुन्हा टाळेबंदी असेल तर मरणयातना भोगण्यासारखीच स्थिती निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस