शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

जवानांच्या मानवाधिकाराबाबत विरोधाभास का ?

By admin | Updated: September 16, 2015 03:35 IST

दहशतवाद्याच्या शिक्षेच्यावेळी अनेक संघटनांकडून मानवाधिकाराचा प्रश्न उपस्थित केला जातो.

पी.जी. कामत : विधी महाविद्यालयाच्या परिषदेचा समारोपनागपूर : दहशतवाद्याच्या शिक्षेच्यावेळी अनेक संघटनांकडून मानवाधिकाराचा प्रश्न उपस्थित केला जातो. उद्योजकाचे हितसंबंध असलेल्या व्यक्तीबाबतही संवेदना उमटतात. माध्यमांमध्येही यावर भरभरून चर्चा रंगते. मात्र दंतेवाडासारख्या घटनेत मारल्या गेलेल्या सुरक्षा जवानांच्या कुटुंबीय किंवा दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या मानव अधिकाराबाबत या संघटना गप्प राहतात. व्यावसायिकांच्या हातात असलेल्या माध्यमांमध्येही याची फारशी चर्चा होत नाही. यावरून सुरक्षा जवानांच्या मानव अधिकाराबाबत समाज व माध्यमांमध्येही विरोधाभासी भूमिका असल्याचे मत लेफ्टनंट जनरल पी.जी. कामत यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात आयोजित परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमांतर्गत बौध्दिक सत्राचे सूत्रसंचालन करतांना पी.जी. कामत बोलत होते. ‘निमलष्करी दल, समाज आणि मानव अधिकार’ या विषयावर आयोजित बौध्दिक सत्राला आयपीएस छाया शर्मा आणि आयपीएस ममता सिंग प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. या विषयांतर्गत ‘सामाजिक न्याय आणि पोलीस व्यवस्था’ या मुद्यावर छाया शर्मा यांनी विचार मांडले. तर ‘संवेदनशीलतेचे प्रश्न, पोलिसांचा व्यवहार आणि मानवाधिकार’ या विषयावर ममता सिंग यांनी मार्गदर्शन केले. बौध्दिक सत्राला मानवाधिकार आयोगाचे संयुक्त सचिव कर्नल डॉ. रणजित सिंग, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार, परिसंवादाच्या समन्वयक डॉ. अधरा देशपांडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. निर्भया प्रकरणानंतर बदल घडतोय : छाया शर्मादिल्लीतील निर्भया प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या छाया शर्मा म्हणाल्या, सर्वच जाती, धर्म आणि वर्गाच्या मानवाधिकाराला धक्का लागू नये म्हणून संविधानात कायदा व सुव्यवस्थेला अधिक महत्त्व आहे. मात्र नागरिक आणि पोलिसांमध्ये समन्वय नसण्याची अनेक कारणे आहेत. यातील प्रमुख म्हणजे लोकांमध्ये असलेली निरक्षरता, कायद्याबदलचे अज्ञान व गरिबी हे होय. दुसरीकडे पोलीस विभागाची प्रतिमा चांगली नसल्याने लोक पोलिसांपर्यंत जात नाही. गुंडांची भीती आणि लोकलाजेमुळेही लोक पोलिसांकडे जायला धजावत नाही. मात्र लोकांचे गप्प राहणेच कायदा व्यवस्थेला अपंग करत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. देशातील कायदा अतिशय मजबूत आहे, मात्र कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर हा बदल घडत असल्याचे छाया शर्मा यांनी सांगितले.पोलीस प्रशासनात ई-गव्हर्नन्सने बदल : ममता सिंगमानवाधिकाराच्या दृष्टीने हरियाणा राज्यात पोलीस प्रशासनात महत्त्वाची आयपीएस ममता सिंग म्हणाल्या, लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी आहे. यातही २४ तास कामाचा दबाव, वरिष्ठांचा दबाव आणि समाजातील अनुभवामुळे पोलिसांचा व्यवहार कठोर वाटतो, मात्र त्यांच्यातही संवेदनशीलता आहे. यादृष्टीने पोलीस प्रशासनात बदलाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. समाजाचा सहभाग वाढविण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंगवर जोर दिला जात आहे. पूर्वी एका पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगाराची माहिती दुसऱ्या स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना होत नव्हती. मात्र ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून देशातील सर्व पोलीस ठाणी आॅनलाईन जोडल्या जाणार आहेत. हरियाणा राज्यात ही प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगत, यामुळे अनेक बदल दिसून येत असल्याचे ममता सिंग म्हणाल्या. महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहेत. अनेक बाबी चांगल्या होत आहेत, मात्र मीडियामध्ये चांगल्या गोष्टी ऐवजी वाईट दाखविण्याची स्पर्धा आहे. बदल हा घडत आहे, मात्र समाजाने भूमिका बदलवून पोलीस विभागाला सहकार्य करावे आणि माध्यमांनीही या गोष्टी हायलाईट कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.