शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

हा कोणता ‘क्लास’

By admin | Updated: April 30, 2015 02:15 IST

सर्वात सुरक्षित आणि स्वस्त प्रवास या दृष्टिकोनातून रेल्वेकडे पाहिले जाते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे.

दयानंद पाईकराव  नागपूरसर्वात सुरक्षित आणि स्वस्त प्रवास या दृष्टिकोनातून रेल्वेकडे पाहिले जाते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. परंतु नागपूर रेल्वेस्थानकावरील परिस्थितीवर कटाक्ष टाकल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा दोन्ही प्रवाशांना सुविधा व सुरक्षा पुरविण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे लक्षात येते. ‘वर्ल्ड क्लास’ रेल्वेस्टेशन म्हणून होत असलेला उल्लेख कुठल्या धर्तीवर केला जातो, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. प्रवेशाची अनेक दारेनागपूर रेल्वेस्थानकावर प्रवेशासाठी अनेक प्रवेशद्वारे असल्यामुळे असामाजिक तत्त्वांचे चांगलेच फावत आहे. यामुळे पाकिटमार प्रवाशांच्या महागड्या वस्तू पळवून थेट रेल्वेस्थानकाबाहेर पडतात. अनेक पळवाटा असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोलीस किंवा रेल्वे सुरक्षा दलाचे जवान उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या असामाजिक तत्वांना कशाचीच चिंता उरत नाही. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील पळवाटा बंद करून असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.बर्थचे आमिष दाखवून फसवणूकबर्थ मिळवून देतो असे सांगून प्रवाशांची फसवणूक करण्याच्या घटनाही रेल्वेस्थानकावर घडत आहेत. बर्थ मिळण्यासाठी प्रवाशांकडून हे समाजकंटक पैसे वसूल करतात. त्यानंतर प्रवाशांना त्यांचे नाव, पत्ता विचारून बर्थ क्रमांक घेऊन येतो असे सांगून एका ठिकाणी बसावयास सांगतात. त्यानंतर हे समाजकंटक आरक्षण कार्यालयात जाऊन त्या प्रवाशाचे तिकीट रद्द करून त्याच्या तिकिटाचे पैसेही घेऊन पळ काढतात. पूर्वेकडील भागातही अनागोंदी कारभारपूर्वेकडील भागात आॅटोचालक रस्त्यावर आॅटो उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. येथे ड्युटीवर असलेले लोहमार्ग पोलीसही त्यांना हटकण्याऐवजी पोलीस बुथमध्ये बसलेले आढळतात. याशिवाय या भागातील आरक्षण कार्यालयातही पाकिटमार नेहमीच प्रवाशांचे पाकीट, मोबाईल पळविण्याच्या घटना घडत असतात. उन्हाळ्यात पंखेही झाले बंदउपराजधानीत ऊन चांगलेच तापत आहे. अशा परिस्थितीत रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी पंखे लावण्यात आलेले आहेत. परंतु यातील बहुतांश पंखे बंद अवस्थेत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी बंद असलेले पंखे सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कुठलीच तसदी घेतलेली दिसत नाही. त्यामुळे बंद असलेले पंखे सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी घाणनागपूर रेल्वेस्थानकावर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील संस्थांनी वॉटर कूलर भेट दिले आहेत. परंतु या वॉटर कूलरच्या बाजूला कचरा आणि घाण साचल्यामुळे तेथे उभे राहण्याची इच्छाही होत नाही. यामुळे अशा घाणीच्या वातावरणात उभे राहून पिण्याचे पाणी भरून घेण्याची पाळी प्रवाशांवर येत आहे. रेल्वे प्रशासनाने या वॉटर कूलरच्या भागात नियमित सफाई करून प्रवाशांना स्वच्छ वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.अवैध व्हेंडरचा बंदोबस्त करण्याची गरजनागपूर रेल्वेस्थानकाच्या इटारसी एण्डकडील आणि लोहापुलाकडील भागातून अवैध व्हेंडर गाडीचा वेग कमी झाल्यानंतर गाड्यात चढतात. ते आपल्याजवळील निकृष्ट खाद्यपदार्थांची विक्री प्रवाशांना करतात. त्यामुळे या अवैध व्हेंडरचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.चालू तिकीट कार्यालयात अनागोंदीरेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या चालू तिकीट कार्यालयाच्या परिसरातील हॉलमध्ये प्रवासी नेहमीच झोपलेले असतात. त्यामुळे या हॉलमध्ये नेहमीच गर्दीचे चित्र दिसते. चालू तिकीट कार्यालयातील खिडक्यांवरही बरीच गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन पाकिटमार नेहमीच प्रवाशांचे पाकिट, महागडे मोबाईल पळविण्याच्या घटना घडतात. या ठिकाणी ड्युटी लावलेले लोहमार्ग पोलीसही तेथे उपस्थित राहत नसल्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. स्वच्छतेच्या कंत्राटाअभावी दुर्गंधीरेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकावरील स्वच्छतेसाठी एका खाजगी संस्थेला कंत्राट दिले होते. परंतु मागील दीड महिन्यापासून या संस्थेचे कंत्राट रद्द करण्यात आले. तेव्हापासून रेल्वेस्थानकावरील स्वच्छता पार ढासळली आहे. प्लॅटफॉर्मवर खाद्यपदार्थांची पाकिटे, केळीची टरफले फेकलेली आढळतात. तर रेल्वे रुळावरही कमालीची अस्वच्छता असल्यामुळे दुर्गंधी पसरल्याचे चित्र दृष्टीस पडते.