शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
2
पुतिन यांनीच फोडला 'बॉम्ब'! तेल खरेदी करण्यावरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
3
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
4
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
5
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
6
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
7
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
8
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
9
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
10
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
11
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
12
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
13
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
14
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
15
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
17
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
18
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
19
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
20
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक

‘ते’ प्राचार्य गुन्हेगार होते का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:15 IST

नवनिर्वाचित सदस्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधीसभेची बैठक विद्वत् परिषदेवरील नामनिर्देशनाच्या मुद्यावरून तापली. विद्वत् परिषदेसाठी पहिल्या यादीतील प्राचार्यांना डावलण्यासंदर्भात कळविण्यात आले नाही. हे प्राचार्य गुन्हेगार होते का, असा संतप्त सवाल विधीसभा सदस्य डॉ. बबन तायवाडे यांनी उपस्थित केला. विधीसभेची बैठक सुरू होण्याअगोदर महाआघाडीच्या सदस्यांनी सभागृहाबाहेर प्रशासनाविरोधात निदर्शने केली.

ठळक मुद्देविधीसभेच्या आत व बाहेर विरोधकांची आक्रमक भूमिका : विद्यापीठ विद्वत् परिषद नामनिर्देशन तापले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवनिर्वाचित सदस्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधीसभेची बैठक विद्वत् परिषदेवरील नामनिर्देशनाच्या मुद्यावरून तापली. विद्वत् परिषदेसाठी पहिल्या यादीतील प्राचार्यांना डावलण्यासंदर्भात कळविण्यात आले नाही. हे प्राचार्य गुन्हेगार होते का, असा संतप्त सवाल विधीसभा सदस्य डॉ. बबन तायवाडे यांनी उपस्थित केला. विधीसभेची बैठक सुरू होण्याअगोदर महाआघाडीच्या सदस्यांनी सभागृहाबाहेर प्रशासनाविरोधात निदर्शने केली.विधीसभेच्या बैठकीला सुरुवात झाल्यावर लागलीच अ‍ॅड.मनमोहन बाजपेयी यांनी सूचनेचा मुद्दा उपस्थित केला. विद्वत् परिषदेत कुलगुरूनामित ११ सदस्यांच्या नावाला राज्यपाल कार्यालयाने मान्यता कळविली होती. या सदस्यांसोबत विद्यापीठाने पत्रव्यवहारदेखील केला. परंतु त्यांना काहीही न कळवता अचानक यादी बदलण्यात आली. असे का करण्यात आले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मृत्युंजय सिंह, डॉ.प्रदीप बुटे यांनीदेखील यात कुलगुरुंवर प्रश्नांचा भडिमार केला. डॉ. बबन तायवाडे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाने पहिल्या यादीतील सर्व सदस्य व प्राचार्यांचा अपमानच केल्याचा आरोप केला. एका प्राचार्यांच्या महाविद्यालयाच्या ‘नॅक’ प्रमाणनाचा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाला. परंतु इतर प्राचार्य तर पात्र होते. त्यांना दूर सारून विद्यापीठाने त्यांची बदनामीच केली आहे. शिवाय त्यांना पत्र पाठविण्याची तसदी घेतली नाही, असे डॉ. तायवाडे म्हणाले. यावेळी डॉ.आर.जी.भोयर यांनी कुलगुरूंच्या भूमिकेला समर्थन दिले. ही यादी गोपनीय असताना ती बाहेर आलीच कशी, असा प्रश्न उपस्थित करत याची चौकशी करण्याची मागणी विष्णू चांगदे यांनी केली. संदीप जोशी यांनी या मुद्यावर अकारण वेळ जात असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. अखेर कुलगुरूंनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. विद्यापीठाने त्या प्राचार्यांना केवळ पत्राद्वारे कळविले होते. त्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध झाली नव्हती. विद्वत् परिषदेतील नामनिर्देशित सदस्यांची निवड करण्याचे कुलगुरूंकडे पूर्ण अधिकार नाहीत. ही राज्यपालांशी सल्लामसलत करुनच करावी असे विद्यापीठ कायद्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. जर कुलगुरूंनी पाठविलेले नाव राज्यपालांना पटले नाही, तर ते त्यात बदल करू शकतात, असे कुलगुरूंनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठagitationआंदोलन