शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक बांधलकी जपणारा एक लग्नसोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 21:22 IST

शहरात सोमवारी झालेल्या एका लग्नसोहळ्यात वर-वधूच्या हस्ते आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना मदत म्हणून आर्थिक भेट देण्यात आली.

ठळक मुद्देआत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबीयांना दिली भेट : समाजापुढे ठेवला आदर्श

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लग्नसोहळ्यात अमाप खर्च करून आनंद लुटला जातो. या आनंदात थोडी सामाजिक बांधिलकीची किनार लाभली तर तो आनंद नक्कीच द्विगुणित होतो. शहरात सोमवारी झालेल्या एका लग्नसोहळ्यात याची अनुभूती आली. वर-वधूच्या हस्ते आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना मदत म्हणून आर्थिक भेट देण्यात आली.भूमिका पांडे व मिथ चौधरी यांचा हा लग्नसोहळा होता. वधू भूमिका यांची आई सविता पांडे या सामाजिक कार्यकर्ता आहेत, तर वर मिथ हा कृषी क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे दोघांनाही ग्रामीण भागाची अवस्था, शेतकऱ्यांची विवंचना याची जाणीव आहे. ही जाणिवच या लग्नसोहळ्याला सामाजिक बांधिलकीची किनार लावून गेली. या लग्नसोहळ्याला आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबीयांना आमंत्रित करण्यात आले. सोमवारी हा लग्नसोहळा पार पडला. सामाजिक बांधिलकी म्हणून या लग्नसोहळ्यादरम्यान आत्महत्या केलेले शेतकरी हरिराम नारनवरे राहणार मोहडी दळवी तालुका नरखेड यांच्या पत्नी मंदाताई हरिराम नारनवरे यांना ११,१११ रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्याचबरोबर धापेवाडा तालुक्यातील आत्महत्या केलेले शेतकरी महादेव रानडे यांच्या पत्नी वंदना रानडे यांना, शेगावमधील रहिवासी शेतकरी मुरलीधर शेंडे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती, त्यांची पत्नी सीमा यांना, वर्धा जिल्ह्यातील बालकिशोर प्रभाकर झाडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा प्रत्येकी ११,१११ रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच अनाथालय चालविणारी जीवन आश्रय सेवा संस्था राणी दुर्गावती चौक व मेडिकलची स्लॅब कोसळून मृत झालेल्या वनिता वाघमारे यांची मुलगी साक्षी वाघमारे यांनाही ११,१११ रुपयांची मदत धनादेशाच्या रुपात करण्यात आली.पांडे व चौधरी कुटुंबीयांनी केलेली ही मदत खूप मोठी नाही, पण या माध्यमातून समाजात सामाजिक भाव रुजावा हा आहे. आपले आनंदसोहळे साजरे करताना पीडितांचे दु:ख कमी करण्याचे भान समाजातही रुजल्यास चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते.

टॅग्स :Socialसामाजिकfarmer suicideशेतकरी आत्महत्या