शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

नागपुरात उत्साहात पार पडले बाहुला-बाहुलीचे लग्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:21 PM

बाहुला-बाहुलीचे लग्न हा एकेकाळी लहान मुलांचा खास आवडीचा कार्यक्रम. उन्हाळ्याच्या सुट्यात आपल्या संवगड्यांसह मोठ्या उत्साहात हे आयोजन करीत आणि मोठ्यांनाही या आनंदात सहभागी करून घेत. मोबाईल, इंटरनेटच्या जगात गुरफटलेल्या आजच्या मुलांना आपली संस्कृती व पारंपरिक खेळ एकतर माहीत नाही किंवा धावपळीत गुंतलेल्या थोरामोठ्यांनाही त्यांना हे सांगायला वेळ नाही. या जुन्या आठवणींची नव्याने ओळख दीनदयाल शोध संस्थान, बालजगतने शुक्रवारी करून दिली. बाहुला-बाहुलीच्या लग्नाचे आयोजन येथे करण्यात आले व यात बालकांसमवेत पालकही मोठ्या उत्साहात सहभागी झाले.

ठळक मुद्देबालजगतमध्ये आनंदी आयोजन : वरात निघाली, मंगलाष्टकही झाले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बाहुला-बाहुलीचे लग्न हा एकेकाळी लहान मुलांचा खास आवडीचा कार्यक्रम. उन्हाळ्याच्या सुट्यात आपल्या संवगड्यांसह मोठ्या उत्साहात हे आयोजन करीत आणि मोठ्यांनाही या आनंदात सहभागी करून घेत. मोबाईल, इंटरनेटच्या जगात गुरफटलेल्या आजच्या मुलांना आपली संस्कृती व पारंपरिक खेळ एकतर माहीत नाही किंवा धावपळीत गुंतलेल्या थोरामोठ्यांनाही त्यांना हे सांगायला वेळ नाही. या जुन्या आठवणींची नव्याने ओळख दीनदयाल शोध संस्थान, बालजगतने शुक्रवारी करून दिली. बाहुला-बाहुलीच्या लग्नाचे आयोजन येथे करण्यात आले व यात बालकांसमवेत पालकही मोठ्या उत्साहात सहभागी झाले.बालजगतच्या उन्हाळी शिबिरांतर्गत बालसंगम व बालरंजन शिबिरात या लुटुपुटीच्या लग्नाचा बेत आखला गेला. ठरलेल्या मुहूर्तावर सजलेले वर-वधू तयार झाले. वराची आई नम्रता पिंपळखुटे व वधूची आई दीपा मानमोडे या सर्वांचे स्वागत करीत होत्या. बच्चेकंपनी आणि त्यांच्यासोबत ज्येष्ठ मंडळीही आकर्षक पारंपरिक वस्त्र परिधान करून लग्नात सहभागी झाले. बालजगतच्या परिसरातून थाटात बाहुल्या वराची वरात काढण्यात आली. तिकडे वधू झालेली बाहुलीही नवरीच्या वस्त्रात तयार होऊन वाट पाहत होती. वरात मांडवात पोहचली तसे वर-वधूला खुर्चीवर बसवण्यात आले. भटजींनी मंगलाष्टक म्हणून लग्नाचा धुमधडाका वाजविला आणि वºहाड्यांनीही आपल्या हातातील अक्षता वधू-वरावर टाकल्या.पूर्वी लहानग्यांच्या खेळात बाहुला-बाहुलीचे लग्न हा हमखास आवडीचा कार्यक्रम. भातुकलीचा खेळ बालकांच्या उत्साहाचा भाग असायचा. यामध्ये थोरामोठ्यांनीही आनंदी वाटायचे. चुरमुऱ्याचे लाडू, भात हे पदार्थ मुलांच्या उत्साहात भर घालायचे. शुक्रवारचे आयोजन बालवर्गाला अनोखा अनुभव देऊन गेला, सोबतच ज्यांनी हा अनुभव घेतला ते पालकवर्ग त्यांच्या लहानपणीच्या आठवणीत हरवले होते. बालजगत गेल्या १६ वर्षापासून हे आयोजन करीत आहे.बालजगतचे सचिव जगदीश सुकळीकर व माधवी जोशीराव यांच्या नेतृत्वात झालेल्या या विशेष लग्नात मंजिरी घाटे, पल्लवी देशपांडे, दर्शना पुणेकर, श्रद्धा श्रोत्री, प्रतिमा देव, योगिता मोहरील, ऋचा जोशी, निकिता लुटे, मोहिनी देवपुजारी, डॉ. उषा शिराळकर आदींचा सहभाग होता.

टॅग्स :cultureसांस्कृतिकmarriageलग्न