शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वेबबेस्ड टू व्हीलर टॅक्सीज अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 20:04 IST

शहरात अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या ‘वेबबेस्ड टू व्हीलर टॅक्सीज’वर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने अखेर गुरुवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली. पाच दुचाकी जप्त केल्या. विशेष म्हणजे, कंपनीने संबंधित ‘अ‍ॅप’ बंद केल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देआरटीओची कारवाई : पाच दुचाकी जप्त : कंपनीने ‘अ‍ॅप’ केले बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या ‘वेबबेस्ड टू व्हीलर टॅक्सीज’वर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने अखेर गुरुवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली. पाच दुचाकी जप्त केल्या. विशेष म्हणजे, कंपनीने संबंधित ‘अ‍ॅप’ बंद केल्याची माहिती आहे.परिवहन विभागाने राज्यात कुठेही ‘वेबबेस्ड’ किंवा तत्सम प्रकार ‘टू व्हीलर टॅक्सीज’ वरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी कुणालाही परवानगी दिली नाही. असे असताना, शहरात मागील महिन्यापासून एका कंपनीने ‘अ‍ॅप’च्या मदतीने ‘टू व्हीलर टॅक्सीज’ सुरू केली. विशेषत: या ‘टॅक्सीज’ नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानक, बर्डी व बसस्थानकावर सुरू होती. काही दिवसात या व्यवसायाने गती पकडली होती. विशेष म्हणजे, याची माहिती आरटीओ कार्यालयांना असूनही कारवाई होत नव्हती. या विरोधात बुधवारी विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर शिष्टमंडळासह शहर आरटीओ कार्यालयात धडकले. प्रवासी वाहतूक करताना परमिटची गरज असताना व ‘टू व्हीलर टॅक्सीज’ बाबात परिवहन विभागाने राज्यात कुणालाही परवानगी दिली नसताना शहरात ही प्रणाली का सुरू आहे, असा प्रश्न केला. सोबतच १५ दिवसांचा अल्टिमेटम देऊन दोषीवर कारवाई करण्याची मागणी करीत आरटीओ जाम करण्याचा इशाराही दिला. अखेर याला गंभीरतेने घेत आरटीओ शहर कार्यालयाने वायुपथकाला कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार ‘रॅपिडो अ‍ॅप’च्या ‘एमएच३१ बीझेड ४१६२, एमएच३१ डीएच ४३६५, जेके १० यु ३४५०, एमएच ४९ वाय २०६८ व एमएच ३१ बीक्यू ३०८९ या दुचाकींवर अनधिकृत व्यवसाय करीत असल्याची कारवाई करीत वाहने जप्त केली.कारवाईपूर्वीच अ‍ॅप झाले बंदसूत्रानूसार, शहरात ५० वर दुचाकी ‘वेबबेस्ड टू व्हीलर टॅक्सीज’ म्हणून धावत होत्या. विशेषत: वर्दळीच्या ठिकाणी या दुचाकीचा फायदा होत असल्याने थोड्याच दिवसात मागणीत वाढ झाली होती. परंतु गुरुवारी कारवाईला सुरुवात होऊन पाच दुचाकी जप्त होताच ‘रॅपिडो अ‍ॅप’ बंद करण्यात आले. वायुपथकातील मोटार वाहन निरीक्षकांनी या ‘अ‍ॅप’वरून दुचाकी बुक करून जप्तीची कारवाई केली. अनधिकृत म्हणूनच कारवाईकोणत्याही ‘वेबबेस्ड’ किंवा तस्सम प्रकार ‘टू व्हीलर टॅक्सीज’वरुन प्रवासी वाहतूक करण्यासाठी कुठेच परवानगी देण्यात आलेली नाही. या विषयी तक्रार येताच गुरुवारी पाच ‘टू व्हीलर टॅक्सीज’वर कारवाई करण्यात आली. पुढेही ही कारवाई सुरू राहील.अतुल आदेउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर आरटीओ

टॅग्स :Taxiटॅक्सीRto officeआरटीओ ऑफीस