शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही चपलाही उचलायला तयार होतो पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 21:00 IST

नाट्यसंमेलनात आम्ही चपलाही उचलायला तयार होतो, पण तो अधिकारही आम्हाला दिला नाही, अशी ओरड नाट्य परिषदेच्या महानगर शाखेकडून होत आहे. संमेलनाच्या आयोजनात महानगर शाखेला डावलल्या जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मानसन्मानावरून नाट्यसंमेलनाच्या आयोजनात वादाची ठिणगी पडली आहे.

ठळक मुद्देमानसन्मानावरून नाट्यसंमेलनात वादाची ठिणगी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाट्यसंमेलनात आम्ही चपलाही उचलायला तयार होतो, पण तो अधिकारही आम्हाला दिला नाही, अशी ओरड नाट्य परिषदेच्या महानगर शाखेकडून होत आहे. संमेलनाच्या आयोजनात महानगर शाखेला डावलल्या जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मानसन्मानावरून नाट्यसंमेलनाच्या आयोजनात वादाची ठिणगी पडली आहे.नागपुरात अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या दोन शाखा आहेत. एका नाट्य परिषदेची नागपूर शाखा आणि दुसरी महानगर शाखा. नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेने संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी दोन्ही शाखेला दिली. संमेलनाच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी नागपूर शाखेला दिली आणि संमेलनाच्या विविध आयोजनात महानगर शाखेला समावून घेण्यात येणार होते. पण संमेलनाच्या आयोजनासंदर्भात गेल्या काही दिवसात झालेल्या बैठकांमध्ये महानगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही. संमेलनाच्या आयोजनासाठी ज्या काही २०-२२ समित्या तयार करण्यात आल्या, त्या समितीच्या अध्यक्षपदाची, निर्णय घेण्याची जबाबदारी महानगर शाखेला दिली नाही. त्यामुळे महानगर शाखेने नाराजी व्यक्त करीत संमेलन आयोजकाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. संमेलनावर बहिष्कार न घालता, आयोजनात सहभागी होणार नाही, अशी भूमिका महानगर शाखेने घेतली आहे.आयोजकांच्या कारभाराला विरोधआतापर्यंतच्या इतिहासात जिथे संमेलन झाले, तिथे जर दोन शाखा असतील तर दोघांनी मिळून संमेलन पार पाडले. पण ९९ व्या नाट्यसंमेलनाच्या आयोजनात आमच्या शाखेला डावलले जात आहे. यासंदर्भात मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रसाद कामडी यांच्याकडे तक्रार केली. तेव्हा कामडी यांनी गिरीश गांधी यांच्यासमोर सन्मानजनक वागणूक देऊ, हवी ती समिती देऊ असा शब्द दिला होता. पुढे संयोजन समितीत माझे नाव टाकले. पण एकाही बैठकीला बोलावले नाही. जेव्हा समित्या ठरविण्याची बैठक झाली तेव्हा नागपूर शाखेने १५ समित्या पूर्वीच ठरवून टाकल्या होत्या. समित्या ठरविताना आम्हाला सन्मानजनक वागणूक दिली गेली नाही. समितीचे अध्यक्ष म्हणून निर्णय घेण्याचे अधिकार दिले नाही. त्यामुळे संमेलनाची जबाबदारी पार पाडणाऱ्या मध्यवर्ती व नागपूर शाखा ज्या पद्धतीने कारभार करीत आहे, त्याला आमचा विरोध आहे. संमेलनादरम्यान घटनात्मक मार्गाने त्याचा आम्ही विरोध करू.सलीम शेख, अध्यक्ष , महानगर शाखा महानगर शाखेच्या ज्या काही तक्रारी होत्या, त्यांनी माझ्याकडे मांडायला हव्या होत्या. पण त्यांच्याकडून कुठल्याच तक्रारी माझ्यापर्यंत आल्या नाही. ऐन संमेलनाच्या तोंडावर तक्रारी पुढे करून, संमेलन वादातीत आणणे योग्य नाही. बऱ्याच वर्षानंतर नागपुरात संमेलन होत आहे, ते चांगले पार पडावे हा माझा हेतू आहे.प्रसाद कामडी, अध्यक्ष, मध्यवर्ती शाखा.

 

टॅग्स :Natakनाटकmarathiमराठी