शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
6
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
7
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
8
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
9
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
10
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
11
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
12
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
13
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
14
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
15
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
16
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
17
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
18
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
19
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
20
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

बहिष्कृतांची वर्गीय बांधणी करावी लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:04 AM

हेवेदावे, अहंकार, अविश्वास अशा अनेक गोष्टी दलित पँथरच्या फुटीसाठी कारणीभूत आहेत. यातून धडा घ्यावा लागेल, कारण परिस्थिती वाईट आली आहे. धार्मिक सरंजामशाहीतून सामान्य माणसाची, संविधानाची व लोकशाहीची कबर खोदली जात आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांच्या राजकारणाची मर्मदृष्टी स्वीकारावी लागेल. चळवळ जातीय चौकटीत खिळून ठेवण्यापेक्षा वेगळे पाडण्यात आलेल्या सर्वहारा, शोषित आणि बहिष्कृतांना एकत्रित करून वर्गीय बांधणी करावी लागेल, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.

ठळक मुद्देयशवंत मनोहर : यशवंत महोत्सवात ‘दलित पँथरचा उत्तरार्ध’वर परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हेवेदावे, अहंकार, अविश्वास अशा अनेक गोष्टी दलित पँथरच्या फुटीसाठी कारणीभूत आहेत. यातून धडा घ्यावा लागेल, कारण परिस्थिती वाईट आली आहे. धार्मिक सरंजामशाहीतून सामान्य माणसाची, संविधानाची व लोकशाहीची कबर खोदली जात आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांच्या राजकारणाची मर्मदृष्टी स्वीकारावी लागेल. चळवळ जातीय चौकटीत खिळून ठेवण्यापेक्षा वेगळे पाडण्यात आलेल्या सर्वहारा, शोषित आणि बहिष्कृतांना एकत्रित करून वर्गीय बांधणी करावी लागेल, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर विभागीय केंद्रातर्फे आयोजित यशवंत महोत्सवात मंगळवारी ‘दलित पँथरचा उत्तरार्ध’ विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी वक्ता म्हणून डॉ. प्रकाश खरात, डॉ. प्रदीप आगलावे, नगरसेविका वंदना भगत, प्रा. रश्मी सोवनी उपस्थित होते. व्यासपीठावर गिरीश गांधी, समीर सराफ उपस्थित होते. डॉ. मनोहर म्हणाले, एक शासन आर्थिक कोंडी करते तर दुसरे शासन धार्मिक सरंजामशाही लादत आहे. वर्तमानात धार्मिक दडपशाहीतून विशिष्ट जाती, धर्म व वर्गाला वेगळे पाडण्याचे कारस्थान होते आहे. या दोन्ही मूलतत्त्वात हजारो वर्षांपासून सामान्य माणूस नागवला गेला आहे. बाबासाहेबांची राजकीय मर्मदृष्टी या नागवलेल्या माणसाला न्याय देण्याची होती. त्यांच्यासमोर कुणी परका नव्हता. शोषित,बहिष्कृ त समाज त्यांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होता. मात्र यांनी जाती-पोटजातीच्या नावाने रिपब्लिकन पक्षाचे तुकडे केले. तुम्ही संविधान मानत असल्याने जाती-धर्माचे राजकारण जुळविणे तुम्हाला शक्य नाही. त्यामुळे विशिष्ट धर्माचे, विचारांचे तत्त्वज्ञान बाजूला ठेवून देशातील सर्वहारा समुदाय व समाजाला एकत्रित करावे लागेल, तेव्हाच माणूस, समाज आणि मानवी मूल्य टिकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.विचार व्यक्त करताना डॉ. प्रकाश खरात यांनी सांगितले की, सामाजिक न्यायाचा उद्देश घेऊन निर्माण झालेल्या दलित पँथरमुळे त्यावेळी शोषणकर्त्यांमध्ये व राज्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती व त्यांच्या कार्याची चर्चा जगभर पसरली होती. ही चळवळ आता संथ असली तरी थांबलेली नाही; कारण यात बुद्ध, फुले व डॉ. आंबेडकरांच्या समानतेच्या विचारांचे अधिष्ठान प्राप्त आहे. जोपर्यंत आर्थिक, सामाजिक शोषण आहे, तोपर्यंत ही चळवळ धगधगत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.डॉ. प्रदीप आगलावे यांनी, दलित पँथरच्या अधोगतीला राजकारणातील सवर्णांची प्रतिक्रांती जबाबदार असल्याचे मनोगत व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून निर्माण झालेल्या चळवळी या सूज्ञ व शोषणाच्या विरोधात उभ्या झालेल्या चळवळी होत्या. यातून केवळ संघर्षच नाही तर प्रस्थापितांना लाजवेल, असा साहित्यिक व सांस्कृतिक वारसा निर्माण केला. सक्षम व्यक्तिविरोधात असक्षम व्यक्ती उभा करून या आदर्श चळवळीला मोडित काढण्याचा प्रयत्न झाल्याची टीका त्यांनी केली. प्रा. रश्मी सोवनी यांनी फाटाफुटीच्या प्रवाहामुळे दलित पँथर अपयशी ठरल्याचे मत व्यक्त केले. असे असले तरी दलित चळवळीने शोषित, वंचितांच्या संघर्षात प्रेरणा निर्माण केली आहे. दलित तरुण परिणामाची पर्वा न करता सूज्ञपणे अन्यायाविरोधात उभा राहण्यास तयार असतो, त्यामुळे अद्याप एक आशा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वंदना भगत यांनी पँथरची चळवळ थांबली नसून पूर्वीसारखा त्याचा दरारा आणि धग कायम असल्याचे मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. संचालन राजेश पाणूरकर यांनी केले. रमेश बोरकुटे यांनी आभार मानले.

टॅग्स :Yashwantrao Chavhanयशवंतराव चव्हाणcultureसांस्कृतिक