शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही शिक्षण घेऊ शकतो, तुम्ही का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 22:02 IST

आम्ही अंध आहोत आणि बहुतेक कामासाठी आम्हाला इतरांवर अवलंबून राहावे लागते. असे असताना आम्ही शिक्षण घेऊन स्वत:चा विकास करू शकतो. तुम्ही तर डोळस आहात आणि हे सुंदर जग पाहू शकता. आम्ही अंध असून करू शकतो, मग तुम्ही का नाही? निसर्गाने दिलेल्या देणगीचा उपयोग करा, चांगले शिक्षण घ्या, अशी प्रेरणादायी दृष्टी अंध विद्यार्थ्यांनी फूटपाथवरील मुलांना दिली.

ठळक मुद्देअंध विद्यार्थ्यांनी फूटपाथवरील मुलांना दिली दृष्टीआत्मदीपम व उपायचे पाऊल

आॅनलाईन लोकमतनागपूर : आम्ही अंध आहोत आणि बहुतेक कामासाठी आम्हाला इतरांवर अवलंबून राहावे लागते. असे असताना आम्ही शिक्षण घेऊन स्वत:चा विकास करू शकतो. तुम्ही तर डोळस आहात आणि हे सुंदर जग पाहू शकता. आम्ही अंध असून करू शकतो, मग तुम्ही का नाही? निसर्गाने दिलेल्या देणगीचा उपयोग करा, चांगले शिक्षण घ्या, अशी प्रेरणादायी दृष्टी अंध विद्यार्थ्यांनी फूटपाथवरील मुलांना दिली. निमित्त होत लुई ब्रेल यांच्या जयंतीचे.ब्रेल लिपीचे संशोधन करून बोटांच्या मदतीने दृष्टिहीनांपर्यंत ज्ञानाचा प्रकार पोहोचविणारे लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त आत्मदीपम सोसायटी आणि उपाय या संस्थेच्यावतीने वसंतराव नाईक झोपडपट्टी येथे फूटपाथवरील मुलांसाठी शाळा भरविण्यात आली. फूटपाथवर भटकणाºया मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा पुढाकार घेण्यात आला. अंध लोकही वाचू आणि लिहू शकतात, याची माहितीच कदाचित फूटपाथवरच्या मुलांना नसावी. यासाठी आत्मदीपम सोसायटीच्या अंध विद्यार्थ्यांनी ब्रेल लिपीतील गाणी आणि गोष्टी मुलांना सांगितल्या. शिक्षणामुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर करण्याची क्षमता आपल्याला मिळते, असे सांगून, आत्मदीपम् सोसायटीच्या सोनाली चवलढाल, प्रशांत पवनीकर, प्रशांत वरुडकर यांनी फूटपाथवरील मुलांचा दोन तास वर्ग घेतला.वरुण श्रीवास्तव यांच्या विचारातून सुरू झालेल्या ‘उपाय’ या संस्थेतर्फे नागपूर शहरात आठ ठिकाणी फूटपाथवर सायंशाळा घेण्यात येतात. संस्थेचे तरुण स्वयंसेवक फूटपाथवर राहणाºया लोकांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यात ६ ते १४ वयोगटातील मुलांचा महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश निश्चित करून, त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे काम संस्था करीत आहे. भारतात २६ मुख्य सेंटर असून, अनेक ठिकाणी फूटपाथ शाळा भरते. एवढेच नव्हे तर गरीब मुलांना शिकविण्याचे कार्यही संस्थेच्या माध्यमातून केले जाते. आत्मदीपम सोसायटीने याच फूटपाथ शाळेत हा वर्ग घेतला. लुई ब्रेल यांनी अंधांना ब्रेल लिपी बहाल करून त्यांनी अंधांच्या जीवनात प्रकाश पोहोचविला व जगण्याचा अर्थ दिला. समाजातील कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहू नये, हीच आमची तळमळ आहे. अंध असूनही जग ज्ञानाने प्रकाशित करण्याचा संकल्पच आम्ही केला आहे.- जिज्ञासा चवलढाल, संस्थापिका आत्मदीपम् सोसायटी

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर