शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

राममंदिराचा ढाचा आम्हीच उभारला : संजय राऊत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:11 AM

अयोध्येमधील राममंदिराचा ढाचा आम्हीच अर्थात आमच्या लाखो शिवसैनिकांनी उभारला. त्यामुळे या विषयाची अस्मिता भाजपाएवढीच आम्हालाही आहे. मात्र शिवसेनेने हिंदुत्वाचे जाहीर प्रगटन करावे, हे भाजपाने आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अयोध्येमधील राममंदिराचा ढाचा आम्हीच अर्थात आमच्या लाखो शिवसैनिकांनी उभारला. त्यामुळे या विषयाची अस्मिता भाजपाएवढीच आम्हालाही आहे. मात्र शिवसेनेने हिंदुत्वाचे जाहीर प्रगटन करावे, हे भाजपाने आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सावरकरांच्या मुद्यावरून भाजपा हिंदुत्वाचा मुद्दा रेटत आहे. शिवसेनेने हिंदुत्व कृतीतून दाखवावे, असेही फडणवीस सांगत आहेत. खरे तर हातची सत्ता गेल्याने भाजपा अस्वस्थ आहे. या अस्वस्थतेतूनच ते सामनामधील वृत्ताचे बॅनर विधिमंडळात झळकवीत आहेत. आम्ही त्यांना आधीपासूनच सचेत करीत होतो. मात्र सामना आधी वाचला असता तर सत्ता जाण्याची पाळी त्यांच्यावर आली नसती, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.आम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांना बांधील आहेत. त्यांच्यापासून पक्ष आणि सरकार दूर जाणार नाही. मात्र भाजपाने जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRam Mandirराम मंदिर