शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही शिवसेनेतंच आहोत, फक्त आम्ही गटनेता बदलला - खा. कृपाल तुमाने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2022 18:01 IST

काही दिवसांपूर्वीच आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत, असे सांगणारे रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले.

नागपूर : आम्ही आजही शिवसेनेतच आहोत, आम्ही फक्त गटनेता बदलला आहे असे खासदार कृपाल तुमाने म्हणाले. ते आज नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.

काही दिवसांपूर्वीच आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत, असे सांगणारे रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. यावर विचारले असता आम्ही शिवसेनेतच असून फक्त गटनेता बदलला आहे, असे स्पष्टीकरण तुमाने यांनी दिले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही गेल्या वेळी भाजपसोबत निवडणूक लढवली होती. आम्ही सर्व १२ खासदार शिवसेनेतच आहोत. आम्ही नाराज होतो कारण आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत होतो. आमचे विचार काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जुळणारे नाहीत. दहशतवाद्यांना मदत करणारे मंत्रिमंडळात होते. मी उद्धव ठाकरे यांना पाच वेळा भेटलो. मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, असंही तुमाने यांनी सांगितलं.

नागपुरात शिवसेनेला आणखी एक धक्का, जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार शिंदे गटात

विनायक राऊत यांचा भयानक त्रास होता. विनायक राऊत आम्हाला सभागृहात बोलू देत नव्हते. गेल्या एक वर्षांपासून विनायक राऊत यांनी बुधवारची बैठक घेतली नाही. विनायक राऊत यांना हटवण्याचं काम गेल्या अधिवेशनातंच होणार होतं. असे सांगतांनाच, उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. पण शरद पवार यांनी त्यांना जबरदस्तीने मुख्यमंत्री केलं असेही खळबळजनक विधान तुमाने यांनी केले. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसायचा काही प्रश्नंच येत नाही. महाविकास आघाडीतून बाहेर पडा हीच आमची मागणी होती, असेही तुमाने यावेळी म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणKrupal Tumaneकृपाल तुमानेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे