शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे कार्य समाजापर्यंत पोहचविण्याचाप्रयत्न करतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:01 IST

गेल्या काही दिवसांपासून नागपूरकरांना नागराज मंजुळे दिग्दर्शित व महानायक अमिताभ बच्चन अभिनय करीत असलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाने भारावून सोडले आहे. संत्रानगरीच्या ज्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे त्या विजय बारसे यांच्याशी चित्रीकरणात घाम गाळणाऱ्या अमिताभ यांनी रविवारी भेट घेतली. रियल लाईफचे बारसे यांनी रिल लाईफमधल्या विजयशी झालेली भेट भारावणारी असल्याचे मनोगत व्यक्त केले.

ठळक मुद्देमहानायकाने विजय बारसे यांना दिला विश्वास चित्रीकरण स्थळावर झाली रिल व रियलची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपूरकरांना नागराज मंजुळे दिग्दर्शित व महानायक अमिताभ बच्चन अभिनय करीत असलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाने भारावून सोडले आहे. संत्रानगरीच्या ज्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे त्या विजय बारसे यांच्याशी चित्रीकरणात घाम गाळणाऱ्या अमिताभ यांनी रविवारी भेट घेतली. रियल लाईफचे बारसे यांनी रिल लाईफमधल्या विजयशी झालेली भेट भारावणारी असल्याचे मनोगत व्यक्त केले.गेल्या आठ-दहा दिवसांपासून नागपुरात या चित्रपटाचे चित्रीकरण होत आहे. मात्र या काळात विजय बारसे शहरात नव्हते. शनिवारी ते शहरात परतले तेव्हा नागराज यांनी अमिताभ यांच्याशी भेटण्याचे आमंत्रण बारसे यांना दिले. त्यानुसार रविवारी सेंट जॉन शाळेत असलेल्या चित्रीकरण स्थळीच बारसे यांनी कुटुंबासह जाऊन बच्चन यांची भेट घेतली. यावेळी पत्नी प्रा. रंजना, मुलगा डॉ. अभिजित व प्रियेश सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. तब्बल १० मिनिटे आमच्यामध्ये धावती चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘तुम्ही अनेक चित्रपटात विजय या नावाने काम केले. माझेही नाव विजय आहे’ असे सांगताच त्यांच्या चेहºयावर हास्य फुलले. यावेळी अमिताभ यांनी, ‘तुमच्या जीवनावर, केलेल्या कार्यावर होत असलेल्या चित्रपटात काम करायला मिळत असून याचा फार आनंद होत आहे’ असे सांगितले. ‘चित्रपटातून तुमचे कार्य व तुमचा संदेश समाजापर्यंत पोहचविण्याचा पूर्ण प्रयत्न करेन’ असा विश्वास त्यांनी दिल्याचे बारसे यांनी सांगितले.अमिताभ यांना भेटण्यासाठी यापूर्वी त्यांच्या घरी व कार्यालयात गेलो होतो. मात्र त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट होऊ शकली नव्हती. यावेळी मात्र तो क्षण आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. ज्यांना भेटण्यासाठी लोक नेहमी उत्सुक असतात त्या महानायकाशी कुटुंबासह प्रत्यक्ष भेट होणे, हे नशीबच होय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र गेली ४०-५० वर्षे केलेल्या कार्यामुळे हे शक्य झाले याचे समाधान वाटते. आपण अभावग्रस्तांसाठी, वंचितांसाठी हवे ते कार्य करू शकतो, हा संदेश समाजापर्यंत पोहचणे महत्त्वाचे आहे. महानायकाच्या माध्यमातून हा संदेश प्रभावीपणे पोहचतो आहे, याचे खरोखरच समाधान वाटत असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. या कार्यामुळेच महानायकाची शुटींग नागपुरात होत आहे, ही नागपूरकर म्हणून गौरवास्पद असल्याची भावनाही त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनnagpurनागपूर