शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

त्या सहायक महिला पोलीस उपनिरीक्षकामुळे आम्ही त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 11:33 PM

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या सहा. महिला पोलीस उपनिरीक्षक डिम्पल नायडू या पदाचा गैरवापर करून आम्हालाच प्रताडित करतात. वेळोवेळी त्या पोलीस असल्याचा धाक दाखवितात. आम्ही त्यांच्यामुळे त्रस्त आहो, अशी तक्रार रजत देशमुख यांनी पोलीस आयुक्तांना केली.

ठळक मुद्देदेशमुख कुटुंबीयांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार : कुत्र्याने चावा घेतल्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या सहा. महिला पोलीस उपनिरीक्षक डिम्पल नायडू या पदाचा गैरवापर करून आम्हालाच प्रताडित करतात. वेळोवेळी त्या पोलीस असल्याचा धाक दाखवितात. आम्ही त्यांच्यामुळे त्रस्त आहो, अशी तक्रार रजत देशमुख यांनी पोलीस आयुक्तांना केली.१७ नोव्हेंबर रोजी डिम्पल नायडू यांना कुत्र्याने चावा घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. मात्र या प्रकरणात डिम्पल नायडू यांनी केलेले आरोप हे चुकीचे असल्याचे रजत देशमुख यांनी आयुक्तांना सांगितले. रजत देशमुख यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याकडे असलेले कुत्रे हे त्यांचा साळा विजयेंद्र प्रतापसिंह यांनी त्याची मैत्रीण स्नेहल पीटर यांच्याकडून काही दिवसांसाठी ठेवण्यास आणले होते. मात्र कुत्र्यावरून डिम्पल नायडू या भांडण करीत होत्या. त्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी रजत देशमुख त्यांची पत्नी व मुलगी कुत्र्यांना सोडण्यासाठी जात होते. दरम्यान पार्किंगमध्ये डिम्पल नायडू आल्या त्यांनी परत भांडण करायला सुरुवात केली. त्यांनी कुत्र्यांना लाथ मारली. कुत्र्याच्या डोक्यावर दांडूही मारला. माझ्या मुलीलाही ढकलून दिले. त्यामुळे कुत्रे खवळल्याने त्यांचा चावा घेतला. त्यांचे पतीही खाली आले. त्यांनीही कुत्र्याला मारहाण केली. त्यामुळे त्यांनाही चावा घेतला. आम्ही त्यांना दवाखान्यात जाण्यास सांगितले. घटनेनंतर कुत्रे साळ्याकडे सोडल्यानंतर त्यांना बघण्यासाठी दवाखान्यातसुद्धा गेलो. परंतु तिथेही त्यांनी भांडण केले. आमच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. या घटनेला वृत्तपत्राने दिलेल्या प्रसिद्धीमुळे आमचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. समाजात व परिसरात बदनामी झाली आहे.माझा शेखुशी संबंध नाहीचावा घेतलेले कुत्रे हे कुख्यात शेखु यांचे असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्याच्याशी माझा संबंध जोडल्या जात आहे. मुळात हे कुत्रे माझे नाही. साळ्याने ते आमच्याकडे त्याची मैत्रीण स्नेहल पीटर हिच्याकडून ठेवण्यासाठी आणले होते. स्नेहलशी आमचा कुठलाही संबंध नाही. मला कुत्र्यांच्या बाबतीत काहीच माहिती नव्हती. त्यामुळे मी कुत्रे साळ्याकडे सोडून दिले. पोलिसांनाही चौकशी केली असता, साळ्याने आणल्याचेच सांगितले.अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणारडिम्पल नायडू यांनी लावलेल्या खोट्या आरोपांमुळे समाजात असलेली आमची प्रतिमा मलीन झाली आहे. समाजात, परिसरात आमच्यावर दोषारोपण करण्यात येत आहे. आमच्या मुलीला त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे डिम्पल नायडू व त्यांचे पती यांच्याविरुद्ध अब्रू नुकसान, प्रतिमा मलीन करणे तसेच मानसिक छळ केल्याप्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे रजत देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिसdogकुत्रा