शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात वेकोली अधिकाऱ्यांनी कापसाचे उभे पीक कापून बनवला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 10:40 IST

वेकोलिच्या सिल्लेवाडा (ता. सावनेर) सब एरिया कार्यालयांतर्गत भानेगाव (ता. सावनेर) खुल्या कोळसा खाणीचे (ओपन कास्ट माईन) काम सुरू केले आहे. या खाणीपर्यंत जाण्यासाठी रस्ता हवा असल्याने वेकोलि अधिकाऱ्यांनी कपाशीच्या शेतात जेसीबी चालवून रस्ता तयार केला.

ठळक मुद्देशेतकऱ्याचे किमान ५० हजार रुपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेकोलिच्या सिल्लेवाडा (ता. सावनेर) सब एरिया कार्यालयांतर्गत भानेगाव (ता. सावनेर) खुल्या कोळसा खाणीचे (ओपन कास्ट माईन) काम सुरू केले आहे. या खाणीपर्यंत जाण्यासाठी रस्ता हवा असल्याने वेकोलि अधिकाऱ्यांनी भानेगाव शिवारातील शेतकऱ्याच्या कपाशीच्या शेतात जेसीबी चालवून बळजबरीने रस्ता तयार केला. हा प्रकार लक्षात येताच शेतकऱ्याने याला विरोध करीत सदर काम बंद पाडले. तरीही यात शेतकऱ्याचे किमान ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. विशेष म्हणजे, याबाबत वेकोलि प्रशासनाने संबंधित शेतकऱ्याला कोणतीही लेखी अथवा तोंडी पूर्वसूचना दिली नव्हती. वेकोलि अधिकाऱ्यांच्या या करंटेपणामुळे परिसरातील शेतकऱ्यांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.वेकोलि प्रशासनाने भानेगाव परिसरात कोळशाच्या खुल्या खाणीच्या कमाला सुरुवात केली आहे. या खाणीसाठी भानेगाव परिसरातील १३१.९० हेक्टर शेतीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. वेकोलि प्रशासनाने ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित केल्या आहेत, त्यातील बहुतांश शेतकऱ्यांसोबत शासकीय नियमानुसार करारनामा केला आहे. यातील काही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा मोबदला देण्यात आला असून, काही प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना नोकरीही दिली आहे.देवराव ढोके, रा. भानेगाव, ता. सावनेर यांची भानेगाव शिवारात साडेतीन एकर शेती आहे. वेकोलि प्रशासनाने ढोके यांचीही शेती कोळसा खाणीसाठी अधिग्रहित केली आहे. वेकोलिने त्यांच्यासोबतही नियमानुसार करारनामा केला. परंतु, त्यांना त्यांच्या शेतजमिनीचा मोबदला अद्यापही देण्यात आला नाही. शिवाय, त्यांच्या वारसांना वेकोलित नोकरीही देण्यात आली नाही. उपजीविकेचे शेतीव्यतिरिक्त दुसरे कोणतेही साधन नसल्याने ढोके यांनी त्यांच्या मालकीच्या शेतीवरील ताबा सोडला नाही. परिणामी, देवराव ढोके यांनी यावर्षी साडेतीन एकर शेतात कपाशीची लागवड केली.आधी मोबदला द्यावावेकोलि प्रशासनाने खुल्या कोळसा खाणीसाठी आपली शेती २००७ साली अधिग्रहित केली. त्यानंतर करारनामा करण्यात आला. मात्र, वेकोलि प्रशासनाने तेव्हापासून आजवर आपल्याला अधिग्रहित शेतीचा मोबदला दिला नाही. मग आपण शेतीचा ताबा सोडायचा कसा, असा प्रतिप्रश्नही देवराव ढोके यांनी लोकमतशी बोलताना केला. आपल्या कुटुंबाची उपजीविका ही शेतीच्या अवलंबून आहे. उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन नाही. तेव्हा वेकोलि प्रशासनाने आपल्याला आधी मोबदला द्यावा, नंतर जमीन ताब्यात घ्यावी, अशी मागणीही देवराव ढोके यांनी केली आहे.नुकसानभरपाई देणार कोण?हा रस्ता तयार करण्यापूर्वी वेकोलि प्रशासनाने देवराव ढोके यांना कोणतीही लेखी अथवा तोंडी पूर्वसूचना दिली नाही. त्यातच हा रस्ता तयार करण्यासाठी जेसीबीच्या मदतीने शेतातील कपाशीची झाडे उपटून फेकण्यात आली. त्यात किमान ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. याची जबाबदारी स्वीकारणार कोण, असा प्रश्न देवराव ढोके यांनी उपस्थित केला. दुसरीकडे, या प्रकाराबाबत आपल्याला कुठलीही माहिती नाही, असे वेकोलिचे नागपूर कार्यालयातील व्यवस्थापक गेडाम यांनी सांगितले. त्यामुळे हा रस्ता कुणाच्या आदेशान्वये तयार करण्यात आला, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

टॅग्स :agricultureशेतीCrimeगुन्हा