शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

सीताबर्डी मार्ग पुन्हा अतिक्रमण मुक्त : ३५ हातठेले, हॉकर्सचे साहित्य ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:47 IST

शहराचा केंद्रबिंदू असलेल्या सीताबर्डीच्या मुख्य मार्गासह इतरही भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. विशेष म्हणजे, वर्षातून एक-दोन वेळा या भागात अतिक्रमणाची कारवाई होते, परंतु दुसऱ्याच दिवशी पुन्हा अतिक्रमण ‘जैसे थे’ होते. शुक्रवारी पुन्हा महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक व वाहतूक परिमंडळ, सीताबर्डीने व्हेरायटी चौक ते सीताबर्डी मार्गावरील अतिक्रमण काढले. या कारवाईत ३५ हातठेल्यांसह हॉकर्सचे साहित्य जप्त करण्यात आले. विशेषत: दुकानांचे अवैध शेडही काढण्यात आले.

ठळक मुद्देमनपा व सीताबर्डी वाहतूक पोलिसांची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहराचा केंद्रबिंदू असलेल्या सीताबर्डीच्या मुख्य मार्गासह इतरही भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. विशेष म्हणजे, वर्षातून एक-दोन वेळा या भागात अतिक्रमणाची कारवाई होते, परंतु दुसऱ्याच दिवशी पुन्हा अतिक्रमण ‘जैसे थे’ होते. शुक्रवारी पुन्हा महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक व वाहतूक परिमंडळ, सीताबर्डीने व्हेरायटी चौक ते सीताबर्डी मार्गावरील अतिक्रमण काढले. या कारवाईत ३५ हातठेल्यांसह हॉकर्सचे साहित्य जप्त करण्यात आले. विशेषत: दुकानांचे अवैध शेडही काढण्यात आले.सीताबर्डी मार्ग हा वर्दळीचा. २४ तास या मार्गावर सतत रहदारी सुरू असते. विशेषत: सायंकाळी वाहन व पादचाऱ्यांची होणारी गर्दी यातच फूटपाथवर व रस्त्याच्या कडेला लागलेले हातठेले व फुटकळ दुकानदारांमुळे वाहतुकीची कोंडी होते. अनेक दुकानदार आपले अर्धेअधिक साहित्य फूटपाथवर आणून विकतात. या अतिक्रमणावर कारवाई होत असली तरी त्याला गंभीरतेने घेत नसल्याने अतिक्रमण विरोधी पथकाची पाठ फिरताच पुन्हा अतिक्रमण होते. शुक्रवारी मनपाचे अतिक्रमण विरोधी पथकाचे अशोक पाटील व वाहतूक परिमंडळ, सीताबर्डीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौक ते सीताबर्डी मार्गाचे अतिक्रमण काढण्यात आले. अचानक सुरू झालेल्या या कारवाईने खळबळ उडाली. रस्त्यावर, फूटपाथवर ठेवण्यात आलेले ट्रकभर सामान जप्त करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय व पोलीस उपआयुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. यावेळी ३५ अवैध हातठेले व हॉकर्सवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. यापुढेही ही कारवाई सुरू राहील, अशी माहिती भांडारकर यांनी दिली.इमामवाडापासून ते कॅन्सर हॉस्पिटलपर्यंत कारवाईमनपाच्या धंतोली झोनच्या अतिक्रमण विरोधी पथकाने इमामवाडा ते कॅन्सर हॉस्पिटलपर्यंत हातठेले, किरकोळ दुकानदारांवर कारवाई केली. कॅन्सर हॉस्पिटलच्या मागे असलेले एक अनधिकृत शेडही तोडण्यात आले. टीबी वॉर्डाच्या मागील भागात असलेली चहा टपरी, नाश्त्याची दुकाने, फळ विक्रेता, भाजीपाल्यांची दुकानांसह १५ अतिक्रमण काढले. सोबतच १२ अस्थायी शेड तोडण्यात आले.पाटणकर चौक भागातील १७ अतिक्रमण काढलेअतिक्रमण विरोधी पथकाच्या मनपाच्या आसीनगर झोनच्या पथकाने पाटणकर चौक ते कामठी रिंगरोडपर्यंतचे अतिक्रमण काढले. यावेळी १७ अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई संजय कांबळे, संजय शिंगणे, भास्कर मालवे आणि त्यांच्या चमूने केली.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPoliceपोलिस