शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाकडे परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 19:35 IST

महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी पाणीपट्टी दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी न देता तो जलप्रदाय विभागाकडे परत पाठविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी पाणीपट्टी दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी न देता तो जलप्रदाय विभागाकडे परत पाठविण्यात आला. जलप्रदाय विभागाने ५ टक्के दरवाढीचा प्रस्ताव दिला होता. निवासींसोबत झोपडपट्टीवासीयांनाही ही वाढ सोसावी लागणार आहे. प्रति युनिटमागे ३५ पैसे जादा द्यावे लागतील. यातून महापालिकेचे उत्पन्न १० ते १३ कोटींनी वाढण्याची अपेक्षा आहे. परंतु कोरोना काळात नागरिकांवर आर्थिक भुर्दंड बसणार असल्याने हा प्रस्ताव मंजूर न करता प्रशासनाने सभागृहाकडे मंजुरीसाठी पाठवावा, अशी शिफारस समितीने केली. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली.निवासी वापरासाठी १ ते २० व २१ ते ३०, ३१ ते ८० आणि ८० युनिट पुढे असे प्रत्येक टप्प्यात ही दरवाढ प्रस्तावित आहे.निवासी वापरासाठी एका रुपयाची तर, झोपडपट्ट्यांसाठी ३३ पैसे ते एक रुपयांपर्यंतची ही वाढ होणार आहे. संस्थात्मक व व्यावसायिक वापराच्या पाण्याच्या शुल्कातही वाढ होणार आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी न देता तो परत पाठविला.पाच टक्के पाणीपट्टी दरवाढीचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत. सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सुधारित दरवाढ लागू होईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली.कोरोनात दरवाढीचा बोजा नकोपाणीपट्टीत दरवाढ ही प्रचलित व दरवर्षी होणारी असली तरी कोरोना संसर्गामुळे व्यवसायिक, नोकरदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यात सर्वसामान्यांना या दरवाढीचा बोजा नको अशी भूमिका स्थायी समितीने मांडली. दरवर्षी एप्रिल महिन्यात पाणीपट्टी दरवाढ केली जाते मात्र यावर्षी उशिराने ही दरवाढ लागू केली जाणार आहे. यात सर्व स्तरातील पाण्याचे दर ३५ पैसे ते एक रुपयांपर्यंत वाढतील१३ कोटींचा महसूल वाढणारपुढील आर्थिक वर्षात मनपाला पाणीपट्टीच्या माध्यमातून २६० कोटींचा महसूल अपेक्षित आहे. यात पाणी पट्टीतून १३ कोटी गृहीत धरण्यात आलेले आहे.संस्थात्मक वापरासाठीच्या तीन स्तरातील ही वाढ आहे. निवासी पाणीवापराच्या तुलनेत व्यावसायिक वापरासाठी पाणीशुल्क अधिक आहे. यामुळे व्यावसायिकावर पाणीपट्टीचा बोजा अधिक पडणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी