शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षे होऊनही उभारले नाही जलकुंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 23:14 IST

पाच वर्षापूर्वी अटल मिशन फॉर रिजुवनेशन अ‍ॅण्ड अर्बन ट्रान्सफॉर्र्मेशन (अमृत) प्रकल्पाअंतर्गत नागपूरसाठी केंद्र सरकारने २२६ कोटी रुपये मंजूर केले होते. त्याअनुषंगावे शहराच्या आऊटर वस्त्यांमध्ये जलकुंभ बनविण्याची आणि पाईपलाईन टाकण्याचे काम होणे गरजेचे होते. मात्र, ते झालेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाच वर्षापूर्वी अटल मिशन फॉर रिजुवनेशन अ‍ॅण्ड अर्बन ट्रान्सफॉर्र्मेशन (अमृत) प्रकल्पाअंतर्गत नागपूरसाठी केंद्र सरकारने २२६ कोटी रुपये मंजूर केले होते. त्याअनुषंगावे शहराच्या आऊटर वस्त्यांमध्ये जलकुंभ बनविण्याची आणि पाईपलाईन टाकण्याचे काम होणे गरजेचे होते. मात्र, ते झालेले नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा याच प्रकल्पाची नवी डेडलाईन ऑगस्ट २०२१ करण्याचा प्रस्ताव सादर होत आहे. सोबतच ज्या कंपनीला हे काम दिले आहे, ती कंपनी आता ४३ पैकी केवळ १७ जलकुंभांचेच काम करण्यास तयार आहे. यामुळे, अमृत योजनेचे कार्यान्वयन जसे दिसते तसे राहीलेले नसल्याचे स्पष्ट होत आहे.केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत अमृत प्रकल्पाअंतर्गत नागपुरात ४३ जलकुंभांचे निर्माण करायचे आहे. २०१६मध्ये नागपूर मनपाला योजनेअंतर्गत काम करण्यास मंजूरी प्राप्त झाली होती. सुरुवातीला या प्रकल्पासाठी २२६ कोटी रुपये निर्धारित होते. नंतर हा निधी वाढविण्यात आला. २८५.६२ कोटी रुपयाच्या या प्रकल्पाचे कार्यान्वयन मे. वॉप्कोस लि.ला देण्याचा निर्णय २० मार्च २०१८ रोजी घेण्यात आला. २९ जून २०१८ रोजी मनपा आयुक्तांनी कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून कन्सल्टन्सी चार्ज पाच टक्केवरून तिन टक्केपर्यंत कमी केले. त्याअनुषंगाने प्रकल्पाची संशोधित किंमत २८०.१८ कोटी रुपये झाली. यात प्रकल्पावर २७२.०२ कोटी रुपये आणि तिन टक्के कन्सल्टन्सी चार्ज देण्याचा निर्णय झाला. स्थायी समितीने ९ जुलै २०१८ रोजी या प्रकल्पाला मंजूरी दिली होती.दहा जलकुंभांचे काम अशक्यसर्वेक्षणाअंती केवळ १७ स्थळांवरच जलकुंभाच्या कामाकरिता विविध विभांगांकडून एनओसी मिळाल्याचे वॉप्कोस कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या संबंधित परिसरातून पाईपलाईन टाकली जाऊ शकते. त्याच अनुषंगाने या १७ जलकुंभांचे काम करण्यास सहमती दर्शवली आहे. ऊर्वरित १६ जलकुंभांचे निर्माण मनपा करणार आहे. इतर १० स्थळांवर जलकुंभांसाठी बऱ्याच अडचणी असल्याने, येथे जलकुंभ बनणे अशक्य आहे.संशोधित प्रस्तावआता प्रकल्पाची संशोधित किंमत २७२.०२ कोटी रुपये करण्यात आली आहे.नव्या प्रस्तावाअंतर्गत वॉप्कोस कंपनी १७ जलकुंभ आणि संबंधित पाईपलाईनचे काम करेल. संबंधित जलकुंभाकरिता १६५ कोटी रुपये खर्चासाठी मंजूरी देण्यात आली आहे.मनपाकडून १६ जलकुंभांचे निर्माण होईल. यासाठी सुधारित खर्च ६८.८४ कोटी रुपये निर्धारित करण्यात आले आहे.ऊर्वरित निधी ३८.१८ कोटी रुपये मनपाच्या प्रस्तावित रोहणा प्रकल्पातून कच्चे पाणी घेण्यासाठी खर्च केले जातील.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी