शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
3
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
4
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
5
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
6
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
7
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
8
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
9
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
10
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
11
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
13
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
14
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
15
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
16
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
17
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
18
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
19
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
20
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी

नागपूर शहरात जलसंकट, चर्चा बॉटलबंद पाणी विकण्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 11:03 AM

शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे, ही महापालिकेची जबाबदारी व कर्तव्य आहे. यामोबदल्यात नागरिकांकडून करसुद्धा घेतला जातो. परंतु आता मनपा बॉटलबंद पाणी विकण्याची तयारी करीत आहे.

ठळक मुद्देदटके समितीने प्रकल्पातील अडचणी दूर करण्यास सांगितले बॉटलिंग प्लान्टने पाणीपुरवठा विभागाला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे, ही महापालिकेची जबाबदारी व कर्तव्य आहे. यामोबदल्यात नागरिकांकडून करसुद्धा घेतला जातो. परंतु आता मनपा बॉटलबंद पाणी विकण्याची तयारी करीत आहे. यासाठी बॉटलिंंग प्लान्ट प्रकल्प तयार केला जाणार आहे. संबंधित प्रस्तावित प्रकल्पाचा आढावा एक सदस्यीय समितीचे अध्यक्ष माजी महापौर प्रवीण दटके यांनी घेतला.मनपा प्रशासनाचा असा दावा आहे की, संबंधित प्रकल्पाच्या भरवशावर पाणीपुरवठा विभागातील विजेचा खर्च ५० टक्के कमी होईल. तसेच हा प्रकल्प सौर ऊर्जेवर चालवला गेला तर आणखी ५० टक्के फायदा होईल. विशेष म्हणजे प्रवीण दटके हे जेव्हा महापौर होते, तेव्हा त्यांनीच बॉटलिंग प्लान्ट टाकण्याचा प्रस्ताव आणला होता. त्यावेळी मनपाच्या या प्रकल्पात तयार होणारे पाणी रेल्वे घेण्यासाठी तयार होते. परंतु नंतर या प्रकल्पाची फाईल पडून राहिली. इतकेच नव्हे तर नागरिकांना हे पाणी स्वस्त किमतीतही उपलब्ध करण्याची तयारी होती. प्रवीण दटके यांनी संबंधित प्रकल्पातील अडचणी दूर करून प्रकल्पाला लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले.बैठकीत उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, आयुक्त अभिजित बांगर, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अजीज शेख, उपायुक्त नितीन कापडणीस, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहसंचालक नगर रचना प्रमोद गावंडे आदी उपस्थित होते.

दटके समितीची उपयोगिता काय?प्रलंबित प्रकल्पाला गती देण्यासाठी महापौर नंदा जिचकार यांनी माजी महापौर प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती गठित केली आहे. समितीचे काम जितकेही महत्त्वाचे प्रकल्प आहेत, त्यातील त्रुटी दूर करण्यास मदत करणे हे आहे. परंतु समितीच्या उपयोगितेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. समितीच्या अध्यक्षाच्या नात्याने दटके वारंवार बैठकी घेतात. दिशानिर्देश देतात. परंतु त्याचे पालन प्रशासन करीतच नाही. तसेच एकाही मोठ्या प्रकल्पाला समितीने आपल्या देखरेखीत रेकॉर्ड वेळेत पूर्ण केलेले नाही. महिना-दोन महिन्यात बैठक घेऊन खानापूर्ती केली जाते. त्यानंतर सर्व शांत बसतात.

एलईडीची डेडलाईनच चुकलीशहरात सर्वत्र पथदिव्यांवर एलईडी लाईट लावण्याची डेडलाईनसुद्धा निघून गेली आहे. समितीचे माजी अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी ही डेडलाईन मे २०१९ निश्चित केली होती. जून महिना सुरू झाला आहे. परंतु अजूनही एलईडी लाईट लावले गेलेले नाहीत. केवळ सतरंजीपुरा झोनमध्येच शंभर टक्के एलईडी लाईट लावण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु उर्वरित झोनमधील परिस्थिती चांगली नाही. प्रवीण दटके यांनी १५ दिवसात एलईडी लावण्याचे निर्देश दिले आहेत.

सिमेंट रोड ठरताहेत डोकेदुखीसिमेंट रोडच्य कामांमुळे सत्तापक्ष भाजप आणि मनपा प्रशासन आपली पाठ स्वत:च थोपटून घेत आहेत. परंतु नागरिकांसाठी मात्र सिमेंट रोडची कामे डोकेदुखी ठरत आहेत. उन्हात सिमेंट रोडवरून जाणाऱ्या नागरिकांना दोन डिग्री तापमान जास्तीचे सहन करावे लागत आहे. पाणी साचण्याची समस्याही निर्माण होत आहे. पहिल्या आणि दुसºया टप्प्याचे काम अजून पूर्ण झालेले नाही, तरी तिसºया टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सिमेंट रोडची उर्वरित कामे सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले आहे. याशिवाय बाजार विकासाच्या रखडलेल्या प्रकल्पावरही यावेळी चर्चा करण्यात आली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई