शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नवेगाव खैरी प्रकल्पातून कन्हान नदीला पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 21:50 IST

कन्हान नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने मागील तीन ते चार दिवसांपासून शहरातील नेहरूनगर, सतरंजीपुरा, आसीनगर आणि लकडगंज या चार झोनमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. याचा विचार करता नवेगाव खैरी प्रकल्पातून कन्हान नदीत ७० दलघमी पाणी सोडण्पाला सुरूवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कन्हान नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने मागील तीन ते चार दिवसांपासून शहरातील नेहरूनगर, सतरंजीपुरा, आसीनगर आणि लकडगंज या चार झोनमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. याचा विचार करता नवेगाव खैरी प्रकल्पातून कन्हान नदीत ७० दलघमी पाणी सोडण्पाला सुरूवात केली आहे.शहरात काही भागात पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाल्याने सोमवारी कार्यकारी महापौर मनीषा कोठे व स्थायी समिती तथा जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी कन्हान येथील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पाणी समस्येमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता जलसंपदा विभागाशी चर्चा करण्यात आली. त्यानुसार नवेगाव खैरी येथील जलाशयातून ७० दशलक्ष घनमीटर पाणी कन्हान नदीमध्ये सोडण्यात आले आहे. नवेगाव खैरी ते कन्हान नदी असा ४४ किमी अंतराचा प्रवाह असून कन्हान नदीत ते पाणी पोहोचायला ४८ तासाचा कालावधी लागणार आहे. नवेगाव खैरी येथून करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्यामुळे लवकरच नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater shortageपाणीकपात