शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागातील जलसाठे ४८.९२ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 21:17 IST

नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह व कामठी खैरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प ८० टक्के भरले आहे.

ठळक मुद्देपाणीसाठ्यांची स्थिती उत्तमतोतलाडोह, खैरी, असोलामेंढा ८० टक्के भरले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा चांगला पाऊस होत असल्याने विभागातील जलसाठ्यांची स्थिती चांगली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच विभागातील मोठे प्रकल्प अर्धे भरले आहेत. यातही नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह व कामठी खैरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प ८० टक्के भरले आहे, हे विशेष.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. याची एकूण पाणीसाठवण क्षमता ३५५२.८९ दलघमी इतकी आहे. यामध्ये आजच्या तारखेला ९ जुलै रोजी १७३७.९२ दसघमी म्हणजेच ४८.९२ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यानुसार प्रकल्पांचा विचार केल्यास नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्प ७९.८५ टक्के भरला आहे. कामठी खैरी ९२.२९ टक्के, वडगाव ५५.११ टक्के, रामटेक खिंडसी १७.८८ टक्के, लोअर नांद वणा २४.४८ टक्के भरले आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ३१.२५ टक्के, सिरपूर २३.७८ टक्के, पुजारी टोला ४५.२३ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा २ प्रकल्प १८.८० टक्के भरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ८४.१२ टक्के, गडचिरोलीतील दिना प्रकल्प २५.९ टक्के भरले आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर धरण ४३.१६ टक्के, धाम ४०.७३ टक्के, पोथरा २५.२९ टक्के आणि लोअर वर्धा ६४.९५ टक्के भरले आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द २२.८६ टक्के, तर बावनथडी प्रकल्प ३०.६९ टक्के भरला आहे.मध्यम व लघु प्रकल्पांचीही स्थिती चांगलीनागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांप्रमाणेच मध्यम व लघु प्रकल्पही हळूहळू भरत आहे. नागपूर विभागात एकूण ४० मध्यम प्रकल्प आहेत. त्यात आजच्या तारखेला ३५.६० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तसेच ३१४ लघु प्रकल्प असून ती आजच्या तारखेला ३२.०२ टक्के भरले.मागील पाच वर्षात सर्वाधिक पाणीसाठाविभागातील १८ मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास मागील पाच वर्षात आजच्याच तारखेला असलेला पाणीसाठा यंदा सर्वाधिक आहे, हे विशेष. विभागातील मोठ्या प्रकल्पांमधील एकूण पाणीसाठा क्षमता ३५५२.८९ दलघमी इतकी आहे. यात गेल्या वर्षी २०१९ मध्ये ९ जुलै रोजी २७०.१७ म्हणजे केवळ ७.६० टक्के इतके पाणी होते. २०१८ मध्ये ७३७.५३ दलघमी, २०१७ मध्ये ३६२.५० टक्के, २०१६ मध्ये ८४४.३८ टक्के आणि २०१५ मध्ये ९४१.५ टक्के इतका पाणीसाठा होता.

 

 

 

टॅग्स :Waterपाणी