शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

नागपुरात पाणी कपात सुरुच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:24 IST

नागपूरसह विदर्भात पाऊस चांगला पडत आहे. पावसाचा बॅकलॉग दूर झाला असला तरी शहराला ज्या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तेथील परिस्थिती मात्र अजुनही सुधारलेली नाही. परिणामी एक दिवसा आड पाणी सोडण्याचा निर्णय आणखी २२ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय मनपा प्रशासनने घेतला आहे.

ठळक मुद्देनवेगाव खैरीतील पाणीसाठा घटला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह विदर्भात पाऊस चांगला पडत आहे. पावसाचा बॅकलॉग दूर झाला असला तरी शहराला ज्या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तेथील परिस्थिती मात्र अजुनही सुधारलेली नाही. परिणामी एक दिवसा आड पाणी सोडण्याचा निर्णय आणखी २२ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय मनपा प्रशासनने घेतला आहे. जेव्हापासून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे तेव्हापासून दर सोमवारी तलावातील साठ्याचा आढावा घेतला जातो. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जातो.शहरात गेल्या दोन आठवड्यांपासून पाऊस सुरु आहे. परंतु ना तोतलाडोह तलाव भरने ना नवेगाव खैरीतील पाणीसाठ्याची स्थिती सुधारली. नवेगाव खैरीमध्ये ५ ऑगस्ट रोजी पाण्याची पातळी ३१८.५५ मीटर नोंदवण्यात आली आहे. तर तोतलाडोह तलावातील पातळी मृत साठ्याच्याही खाली गेले आहे. येथील मृतसाठ्याची पातळी १५१ एमएमक्यूब आहे. या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी ३० एमएमक्यूब पाण्याची आवश्यकता आहे. या दोन्ही तलावावर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अवलंबून आहे. या पावसाळ्यात हे दोन्ही तलाव भरले नाहीत तर शहरात एक दिवसा आड पाणीपुरवठ्याचा निर्णय आणखी पुढे वाढवला जाऊ शकतो.सोमवारी मनपा पाणीपुरवठा विभाग आणि ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पाण्याच्या पातळीवर चर्चा झाली. तेव्हा पाण्याची पातळी वाढण्याऐवजी आणखी घटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला. जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी सांगितले की, पाणी कपात सुरु राहील. धरणातील पाणीसाठ्यात वाढ न होणे ही शहरासाठी चिंतेची बाब आहे. भविष्यात काय होईल, त्यावर आताच काही बोलणे योग्य होणार नाही.वाढण्याऐवजी घटत आहे पातळीनवेगाव खैरी येथील पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे एक दिवसा आड कपातीचा निर्णय पेंचशी जुळलेल्या शहरातील भागांसाठी घेण्यात आला. शहराती जवळपास ७० टक्के भागाच पेंचमधून दररोज ५०० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. पेंचमध्ये नवेगाव खैरीमधून पाणी येते. नवेगाव खैरीमध्ये १५ जुलै रोजी जलस्तर ३१८.३६ मीटर होते. आठवडाभरानंतर २९ जुलै रोजी ते वाढून ३१८.६० मीटरपर्यंत पोहोचले. परंतु ५ ऑगस्ट रोजी येथील जलस्तर ०.०५ मीटर खाली जाऊन ३१८.५५ मीटरवर पोहोचले. ही चिंतेची बाब आहे. भर पावसाळ्यात ही स्थिती असेल तर पुढे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater shortageपाणीकपात