शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय : प्रशासनाच्या नावाने ओरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 23:52 IST

रेल्वेच्या शौचालयांमध्ये पाणीच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून नागपुरात पोहोचलेल्या महिलेने या प्रकारावर संताप व्यक्त करीत उप स्टेशन व्यवस्थापक कार्यालयात लेखी तक्रार नोंदविली आहे.

ठळक मुद्देनागपूर स्थानकावर प्रवासी महिलेची लेखी तक्रार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वेच्या शौचालयांमध्ये पाणीच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून नागपुरात पोहोचलेल्या महिलेने या प्रकारावर संताप व्यक्त करीत उप स्टेशन व्यवस्थापक कार्यालयात लेखी तक्रार नोंदविली आहे. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधील इतर प्रवाशांनीसुद्धा प्रशासनाच्या नावाने आरडाओरड करून आपला रोष व्यक्त केला.१२१०२ हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस रविवारी रात्री नियोजित वेळेत रवाना झाली. पहिले रेल्वेस्थानक येण्यापूर्वीच बी-३ क्रमांकाच्या कोचमधील दोन्ही बाजूच्या शौचालयांमध्ये पाणी येणे बंद झाले. याच डब्यातून शर्मिला सेनसागर या मुलासह प्रवास करीत होत्या. त्यांनी याबाबत सफाई कर्मचाऱ्यांना सूचना दिली. त्यांनी टीटीकडे बोट दाखविले. यामुळे त्यांनी टीटीलासुद्धा पाणी नसल्याचे सांगितले. बिलासपूर स्थानकावर पाणी भरले जाईल, असे सांगून टीटीने वेळ मारून नेली. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही गाडी बिलासपूर स्थानक सोडून पुढे रवाना झाली. मात्र तरीही कोचमध्ये पाणी भरण्यात आले नाही. यामुळे अन्य प्रवाशांसोबतच शर्मिला सेनसागर यांनी रोष व्यक्त करीत जाब विचारला. त्यांनी बी-३ क्रमांकाच्या डब्यात जाऊन बघितले असता तिथेसुद्धा पाणी नव्हते. कर्मचारी, टीटीची कान उघाडणी केली. यानंतर अचानक नळाला पाणी आले. याचा अर्थ टाकीत पाणी असले तरी ते बंद करून ठेवण्यात आले होते. पाणी आल्यावरसुद्धा फ्लशर मात्र योग्यरीत्या काम करीत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. ही गाडी नागपूर स्थानकावर पोहचल्यानंतर सेनसागर यांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात पाणी बंद का करून ठेवले, असा सवाल उपस्थित करीत लेखी तक्रार नोंदविली.हा तर नित्याचाच प्रकारकामाच्या निमित्ताने दर आठवड्यातच हावडाला जाणे येणे करावे लागते. या मार्गावर नेहमीच अशीच अवस्था असते. पाणीच राहत नसल्याने शौचालये अस्वच्छ असतात. मनस्ताप सहन करीत प्रवास करावा लागत असल्याचे शर्मिला सेनसागर यांनी सांगितले. रेल्वेत दोन स्वच्छता कर्मचारी असतात, त्यामुळे शौचालयात पाणी आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी त्यांची असून ते जबाबदारी झटकतात. याचा प्रवाशांना मनस्ताप होत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरwater shortageपाणीकपात